साहित्य :एक मोठी काकडी , अर्धा इंच आले, बारीक
चिरलेली कोथिंबीर , एक चमचा लिंबाचा रस, दोन कप गोड ताक, मीठ, मिरेपूड,
चाट मसाला, थोडा बर्फ. कृती :काकडीची साले काढून त्याचे तुकडे
करा.मिक्सरमध्ये
काकडीचे तुकडे, आले, लिंबाचा रस,
साखर, मीठ घालून बारीक करा. नंतर त्यात थंडगार ताक, बर्फ, चाट मसाला व
बारीक चिरलेलि कोथिंबीर घाला व थंड करून
सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment