कारल्याची मसाला रस भाजी
साहित्य
: ४-५ माध्यमाकाराची ताजी कोवळी कारली , एक वाटीभर चिंचेचा कोळ , चवीनुसार मीठ ,लाल मिरचीचे
तिखट , एक कांदा , एक टोमाटो , आल्याचा पेरभर तुकडा , ८-१० लासणाच्या पाकळ्या , एक वाटी भरून ओल्या नारळाचा खोवलेला चव , एक वाटी
भरून चिरलेली कोथिंबीर , फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल व मोहरी,जिरे,हिंग व हळद
कृती : प्रथमकारली धुवून साफ व कोरडी करून घ्या व कारल्याचे तुकडे करून घ्या . नंतर मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमाटो ,आले ,लसूण ,ओल्या नारळाचा चव , कोथिंबीर यांचा वाटण करून घ्या
गॅसवर कढइत दोन चमचे तेल टाकून फोडणी करून घेऊन दोन मिनिटे ती परतून घ्या व मग त्या फोडणीत मसाला वाटण घाला व ते सुद्धा चांगले परतून घ्या , त्यात चवीनुसार मीठ, तिखट आणि कारल्याच्या फोडी टाकून पुन्हा एकदा परतून घ्या. आता चिंचेचा कोळ घाला आणि रसासाठी एक ग्लास पाणी टाकून कढईवर झाकण ठेऊन १५-२० मिनिटे शिजवा, भाजीला जरूर असेल तसा रस ठेवा !
भाजीवर वरून ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीर टाकून डिश गारनिश करून सजवा
ही कारले रस मसाला भाजी अजिबात कडू लागणार नाही

No comments:
Post a Comment