काकडीची खारी लस्सी
साहित्य : दोन
काकड्या,अर्धा
किलो मलईचे घट्ट मटका दही,अर्धा चमचा सैंधव मीठ,अर्धा चमचा जिरे पूड,अर्धी मूठ बारीक चिरलेली
कोथिंबीर ,बर्फाचे २-३ खडे
कृती : काकड्यांची साले काढून घेऊन दोन्ही बाजूचा
शेवटचा भाग कापून काढावा. काकडीचे बारीक तुकडे करून घ्यावेत किंवा किसून घ्यावी.
मिक्सरच्या भांड्यात काकडीचे तुकडे किंवा कीस,सैंधव मीठ,मलईचे घट्ट मटका दही ,जिरे पूड व थोडी बारीक चिरलेली कोथिंबर घालून फिरवून घ्यावे. लस्सी फार
दाट वाटल्यासच थोडेसे पाणी घालावे.
लस्सी सर्व्ह
करतेवेळी बर्फाचे तुकडे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
No comments:
Post a Comment