Friday, 22 June 2018

#शेपूच्या दशम्या/ #पराठे

साहित्य : एक जुड्डी शेपू , चवीनुसार १-२  हिररव्या मिरच्या , ५-६ लसूण पाकळ्या , दोन वाट्या कणिक, दोन टेबलस्पून ओट्स, चवीनुसार मीठ , एक चमचा ओवा,आवश्यकतेनुसार पाणी.
कृती :   शेपू निवडून , धुवून, बारीक चिरून घेणे त्यात लसुण , मिरचीचा ठेचा , मीठ आणि दोन टेबलस्पून ओट्स घाला.
मावेल तशी कणिक (गव्हाचे पीठ) घेऊन पोळ्यांसाठी मळतो तशी कणिक मळून ठेवा व  १५ मिनिटांनी पराठे लाटून तेल/ तूप लावून भाजा. 

#आंबेहळदीची चटणी

#आंबेहळदीची चटणी


साहित्य : अर्धा वाटी ओल्या नारळाचा खोवलेला चव,एक २ “ लांब आंबेहळदीचा तुकडा , पेरभर आल्याचा तुकडा, ४ ५ लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार दोन हिरव्या मिरच्या , चवीनुसार मीठ , एक चमचा साखर , एक टेबलस्पून लिंबाचा रस वरुन फोडणी देण्या साठी दोन चमचे तेल, व ८-१० कढीपत्त्याची पाने, एक चमचा मोहरी.


कृती : प्रथम ओल्या नारळाचा खोवलेला चव, आंबेहळदीचा तुकडा , आल्याचा तुकडा, लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या , मीठ , साखर व लिंबाचा रस हे सर्व साहीत्य मिक्सरच्या ग्राइंडरच्या भांड्यात घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या व वरून कढीपत्ता आणि मोहरीची तेलाची तडका फोडणी द्यावी , फोडणी ओतल्यावर २ मिनीट चटणी वर झाकण ठेवावे

Thursday, 21 June 2018

#पंचामृतसाहित्य : अर्धी वाटी चिंचेचा कोळ काढून , अर्धी वाटी गोटा (सुक्या) खोबर्याेचे पातळ काप करून , अर्धी वाटी भाजलेल्या पांढर्याअ तीळाचे कूट , अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे भरड कूट , चवीनुसार ७-८ हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे , पाव वाटी मनुका, बेदाणे, काजू , चवीनुसार अर्धी वाटी किसलेला गूळ , २-३ चमचे ब्राह्मणी गोडा (काळा) मसाला , फोडणीसाठी मोहोरी , हळद , हिंग व ८-१० कढीपत्त्याची पाने
कृती: गॅसवर एका पातेल्यात फोडणीसाठी तेल तापवून घेऊन त्यात मोहोरी,हिंग, हळद, मिरच्या व कढीपत्त्याची पाने घालून फोडणी करुण घेऊन त्यात सुक्या खोबर्यावचे काप परतून घ्यावेत व नंतर चिंचेचा कोळ घालून एक उकळी काढून घेऊन मग त्यात गोडा मसाला, शेंगदाण्याचे कूट , बेदाणे, मनुका, काजू घालून आणखी थोडे पाणी घालून , तिळाचे कूट व गूळ घालून हवे तेव्हढे घट्ट होईपर्यंत आटवावे.

#भेंडीचे #पंचामृत

भेंडीचे  पंचामृत

साहित्य : वाटीभर भेंडीचे गोल पातळ चिरलेले काप,लिंबाएव्हढा चिंचेचा गोळा,चवीनुसार मीठ व गूळ,अर्धा चमचा लाल मिरचीचे तिखट,एक टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट,एक टेबलस्पून भालेल्या तीलाचे कूट,फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,अर्धा चमचा जिरे,अर्धा चमचा मोहरी,अर्धा चमचा बारीक चिरलेला लसूण,५-६ कढीपत्त्याची पाने.
कृती : प्रथम गरम पाण्यात चिंच १५ मिनिटे भिजत घालून ठेवा. १५ मिनिटांनी भिजलेल्या चिंचेचा कोळ काढून ठेवा.
आता गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून घ्या. तेल चांगले गरम झाले की त्यात जिरे व  मोहरी टाका व दोन्ही चांगली तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण व कढीपत्त्याची पाने टाकून परता व नंतर त्यात भेंडीचे गोल पातळ चिरलेले काप टाकून परतून घ्या. वाफेवर भेंडी थोडी शिजली की,चिंचेचा कोळ, गुळ,तिखट, मीठ टाकून उकळी आली की मग दाण्याचे कुट व तीळाचे कुट टाकुन छान शिजू द्या.(कच्या चिंचेचा उग्र वास जाईपर्यंत शिजवा)सगळे घटक चांगले शिजले की गॅस बंद करा. आपले भेंडीचे पंचामृत तय्यार. जेवणात डावीकडचे तोंडीलावणे म्हणून सर्व्ह करा. छान लागते.

#निनाव #वड्या


निनाव वड्या
साहित्य : एक वाटी बेसन पीठ , एक टेबलस्पून कणीक, एक वाटी (किंवा आवडीनुसार कमी-जास्त) गूळ , एक छोटा चमचा विलायची पावडर , एक चिमुटभर जायफळाची पावडर , एक वाटीभर नारळाचे दूध, बदाम, पिस्ता व काजू काप , बेदाणे व चारोळया,आवडत असल्यास एखाद्या आवडत्या ईसेन्सचे दोन-तीन थेंब .
कृती : सर्वप्रथम गॅसवर एक फ्राय पॅनमध्ये एक टेबलस्पून साजूक तूप गरम करून त्यात बेसनपीठ व कणिक खरपूस भाजून घ्यावे. नंतर मिक्सरच्या मोठ्या भांड्यात ओल्या नारळाच्या काढलेल्या दुधात भाजलेले बेसन पीठ,कणीक आणि बाकीचे सर्व पदार्थ घालून नीट मिक्स करून घ्यावेत , त्यात गुठळी बनणा / ररहाणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर गॅसवर मध्यम आचेवर एका पॅनमध्ये हे सर्व मिश्रण ओतावे व आवडत असल्यास एखाद्या आवडत्या ईसेन्सचे दोन-तीन थेंब घालून साधारणपणे पिठल्याएव्हढे घट्ट होईपर्यंत ढवळत रहावे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून ते मिश्रण शिजवत ठेवावे. साधारण करपल्यासारखा वास आला की समजावे की निनाव झाले असे समजावे.

एका ट्रेमध्ये किंवा स्टीलच्या पसरत ताटात तूप लावून त्यात हे मिश्रण काढून घ्यावे व लाकडी उलथण्याने किंवा वाटीच्या बुडाला तूप लावून दाबून एका समान जाडीच्या पातळ वड्या थापाव्यात. सर्वात शेवटी बदाम, पिस्ता , काजू यांचे काप बेदाणे व चारोळया वगैरे पेरून या वड्या सजवाव्यात.थंड झाल्यावर हव्या त्या आकारात वड्या कापाव्यात व ट्रे किंवा ताटातून काढून डब्यात भरून ठेवाव्यात.

Tuesday, 19 June 2018

#मेथी - #केळी वडे"

"मेथी - केळी वडे"

साहित्य : बारीक चिरलेली मेथी,एक पिकलेले केळं,बेसन/चणा डाळीचे पीठ,चवीनुसार हिरव्या  मिरचीचा ठेचा,लाल मिरचीचे तिखट,मीठ,ओवा,धने पूड,चिमूटभर साखर,चिमूटभर खायचा सोडा.
कृती : प्रथम मेथी बारीक चिरून व केळं कुस्करून घ्या. मग दोन्ही एकत्र करून त्यात वरील सर्व साहित्य तुमच्या अंदाजाने घालावे. थोडे कच्च्या तेलाचे मोहन घालून घट्टसर मळून घ्या. अर्धा एक तास तसेच मुरत ठेवावे. ह्या पिठाचे हातावर चपटे वडे थापून घेऊन गोल्डन रंगावर तळावेत.
चटणी सॉस किंवा गरम गरम चहा सोबत खायला द्या


Friday, 25 May 2018

#बेलफळाचे सरबतबेलफळ हे अमृत फळ आहेच.मधुमेहात बिघडलेल्या चयापचय क्रियेत मोलाची साथ देतो.पोटाचे तसेच पूर्ण शरीराची स्वच्छता होते..
साहित्य : चार पूर्ण पिकलेली बेलफळे,दोन वाट्या साखर,एका लिबाचा रस,एक छोटा चमचा वेलची पूड,४-५ केशराच्या काड्या, चिमूटभर मीठ. 
कृती : बेलफळे फोडून चमच्याने बेलफळांच्या आंतला गर काढून घ्या. एका बाऊलमध्ये बेलफळाचा गर घेऊन त्यात याच्या दुप्पट साखर,एका लिंबाचा रस,चिमूटभर मीठ,वेलची पूड ,केशराच्या काड्या व जरुरिप्रमाणे पाणी आणि बर्फाचे तुकडे घालून मिक्सरच्या ब्लेंडरमध्ये फिरवून सरबत बनवा.
सव्हिंग ग्लासेसमध्ये काढून पुदिन्याच्या पांनानी सजावट करून सर्व्ह करा.