Search This Blog

Thursday, 20 September 2018

झटपट रवा आप्पे

झटपट रवा आप्पे



साहित्य : एक वाटी रवा ,पाव वाटी उडीद डाळीचे पीठ-, एक चमचा सायट्रिक अ‍ॅसिड (क्रिस्टल), अर्धा चमचा ईनोज फ्रूट सॉल्ट , एक चमचा आले लसूण पेस्ट , पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, गरजेनुसार तेल,चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार ताक

कृती : प्रथम मिक्सरच्या एका भांड्यात रवा,उडदाचे पीठ, ईनोज फ्रूट सॉल्ट,सायट्रिक असिड क्रिस्टल व चवीनुसार मीठ घालून फिरवून घ्यावे म्हणजे मिश्रण चांगले एकजीव होईल .गॅसवर आप्पेपात्र गरम करत ठेवावे  व ते गरम होईस्तोवर वरील तयार मिश्रणात ताक घालून मिश्रण इडलीच्या पीठाइतपत घट्टसर भिजवावे ,आता यांत बारीक चिरलेली कांदा,आलं-लसूण-मिरची पेस्ट तसेच बारीक चिरलेली कोथींबीर घालून मिश्रण एकजीव करावे .
आता आप्पेपात्राला थोडे तेल लावून त्यात वरील तयार मिश्रण चमच्याने घालावे  व झाकण लावून ठेवावे एक बाजू चांगली खरपूस झाली कि आप्पेपात्रासोबत मिळणाऱ्या काट्याने दुसरी बाजू उलटून घ्यावी व थोडे तेल सोडून पुन्हा झाकण ठेवून दुसरी बाजूही खरपूस करून घ्यावी
तयार आप्पे टोमॅटो सॉस किंवा  नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करावे .


Monday, 17 September 2018

#दूधसार#

ऋता भागवत यांनी मला फॉरवर्ड केलेली कोल्हापूर राधानगरीची ही जरा हटके दूधसार ची रेसिपी आपल्याला नक्कीच आवडेल असा विश्वास वाटतो.
#दूधसार#
जवळपास २० वर्ष झाली आमच्या शाहूपुरी युवक मंडळाच्या गणपती उत्सवाचे काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मेनू मध्ये एक हमखास पदार्थ असायचा आणी आजही असतोच तो म्हणजे दूधसार म्हणजे चक्क दुधाला तिखटाची फोडणी दिलेली दुधाची आमटी........
शाहूपुरीतील प्रसिद्ध बापू आचारी एक हाताने....🚬 फुकत दुधसार करताना दूध फाटत कसे नाही असले बालिश प्रश्न तेंव्हा मनात यायचे नाहीत, जे समोर येतंय ते हणायचे असा तो काळ.
कालांतराने बापू गेला आणि या अनोख्या दुधसार डिश साठी प्रसिद्ध असणाऱ्या राधानगरीहून खास मसाला घेऊन माणूस येऊ लागला , मग तो दुधसार तयार करताना मी त्याच्या बाजूला घुटमळने हे आलेच,😁 पण तो पठ्या काही त्याने आणलेल्या खास मसाल्याच्या जवळ मला फिरकू द्यायचा नाही, व त्यातील जिन्नसही सांगायचा नाही त्यामुळे हा वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ स्वतः करायची मनातील इच्छा मनात असूनही अनेक वर्षे पूर्ण होऊ शकली न्हवती, पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग हमखास सापडतोच त्याप्रमाणे एक छोटी पायवाट मला सापडली झाले असे, बंधुराज गेले होते वर्षा पर्यटन साठी राधानगरीत, त्यांना तिथे कळले की दूधसार चा तयार कोरडा मसाला आता राधानगरीत उपलब्ध झाला आहे , माझे दुधसारप्रेम आमचे या लाडक्या शेंडेफळास माहीत असलेमुळे त्याने लगोलग मसाल्याची २ पाकिटे खरेदी केली व ती काल रात्री माझ्या हातात ठेवली ................मग रात भर सपनात दुधसारच दिसाल्त की वं😍😍😍 मग पुढं काय झालं ? हे फोटोत दिसायलाय ह्ये, आणि...........
लै सालाची मनातली इच्छा पूर्ण झाल्याचं मनाचे समाधान 😁😁😁😁😊😊
#कसं करायचं?*
पयला मसाला पाकीट आणायला राधानगरीला कुनाला तरी धाडायचं😉
एक कांदा बारीक चिरून शेंगतेलात परता, त्यात ३बटाटे बारीक तुकडे करून घाला, मग दोन चमचे तिखट आणि त्यो मसाला त्यात मिक्स करा , आणि एकलिटर दुध घाला , चांगल उकळीे येईस्तोवर ढवळा, बटाटा शिजला की तय्यार.
महत्वाचे मीठ घालायचे नाही खाताना वरून घालायच. वरून कोथिंबीर भुरभुरा आणि पावासोबत द्या दणका🤪😋😋
मी आपला चाटकी जीभ संघटना स्वयंघोषित अध्यक्ष
#प्रथमेशजोशी.9970105000#

Sunday, 16 September 2018

लाल (कच्च्या) चिंचेची चटणी

#लाल (कच्च्या) #चिंचेची #चटणी


आज २-३ लाल कच्च्या चीनचा मिळाल्या. म्हणून  मग लाल क्कच्या चिंचेची चटणी खायची इच्छा झाली आणि लगेच चटणी केल स्द्धा. त्याचीच ही सचित्र रेसिपी
साहित्य : कच्च्या लाल चिंचेची आंबटपणानुसार २-३ बुटुके,चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्या,साखर,मीठ,आल्याचा तुकडा,लसणाच्या पाकळ्या,ओल्या खोबर्‍याचे तुकडे,अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे

कृती : मिरच्यांची चव (तिखटपणा) व आपली आवड यानुसार मिरच्या घ्या. त्यांची देखे तोडून बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका. चवीनुसार (आंबटपणा बघून)  चिंचेची २-३ बुटुके ,साखर आणि मीठ घ्या. आल्याचा तुकडा मिक्सरमहये टाका. लसणा च्या पाकळ्या टाका. ओल्या खोबर्‍याचे उकडे आणि अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे घ्या,थोडेसे पानी घालून मिक्सरवर चटणी वाटून चव बघा ,एखादी चव कमी वाटली तर वाढवून पुन्हा एकदा मिक्सर फिरवून ह्या आणि चटणी सटांत (सर्व्हिंगबाउल) काढून घ्या .                                                                                                                                                                                                                        

Sunday, 9 September 2018

#कच्च्या #टोमॅटोची #चटणी




















दोन मध्यम कच्चे टोमॅटो घेऊन त्याच्या फोडी करा . चार तिखट मिरच्यांचे तुकडे करा .
प्रथम दीड डाव तेलाची मोहरी , हिंग , हळद घालून फोडणी करा , त्यात दीड टेबल स्पून तीळ , अर्धी वाटी किसलेले कोरडे खोबरे , मिरच्यांचे तुकडे घालून थोडेसे खमंग परता नंतर टोमॅटोच्या फोडी घालून पाच मिनिटे जरासे परता. थंड झाल्यावर चवीनुसार मीठ व साखर घालून मिक्सरवर फिरवून चटणी वाटून घ्या . जरासे रवालाच ठेवा. झाली मस्त चवीची चटणी तय्यार !

Friday, 7 September 2018

#इडली पोहा #भुर्जी

#इडली पोहा #भुर्जी


साहित्य : ५-६ आदल्या दिवशीच्या शिल्लक उरलेल्या इडल्या, एक वाटी जाड पोहे,चार बारीक चिरलेले कांदे,१” आल्याचा तुकडा,४ टेबलस्पून तेल, प्रत्येकी अर्धा चमचा जिरे व मोहरी,एक छोटा चमचा हळद,अर्धी मूठ बारीक चिरलेलो कोथिंबीर,अर्धा चमचा हिरवी मिरची पेस्ट,चवीनुसार मीठ.
कृती : आगोदर आदल्या दिवशीच्या शिल्लक इदल्यांचा हाताने कुस्करून बारीक चुरा करून ठेवा.पोहे स्वच्छ पाण्याने धुवून एका चाळणीत पाणी निथळत ठेवा,आले किसून ठेवा. ही सगळी पूर्व तयारी झाली की मग गॅसवर एका नॉनस्टिक पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात जिरे व मोहरी टाकून दोन्ही चांगले तडतडल्यावर त्यात मिरची पेस्ट घालून परता. मद बारीक चिरलेला कान्दा घालून तो गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.


आता त्यात चाळणीतले पाणी निथळून झालेले पोहे झार्याघने हलवून घालून चांगले मिक्स करून घ्या व मग इडल्यांचा बारीक चुरा घालून परता व झार्याहने खालीवर हलवत मिक्स करून घ्या. चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व मिक्स करून घ्या. ग
रम असतांनाच सर्व्ह करा.