ऋता भागवत यांनी मला फॉरवर्ड केलेली कोल्हापूर राधानगरीची ही जरा हटके दूधसार ची रेसिपी आपल्याला नक्कीच आवडेल असा विश्वास वाटतो.
#दूधसार#
#दूधसार#
जवळपास २० वर्ष झाली आमच्या शाहूपुरी युवक मंडळाच्या गणपती उत्सवाचे काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मेनू मध्ये एक हमखास पदार्थ असायचा आणी आजही असतोच तो म्हणजे दूधसार म्हणजे चक्क दुधाला तिखटाची फोडणी दिलेली दुधाची आमटी........
शाहूपुरीतील प्रसिद्ध बापू आचारी एक हाताने....🚬 फुकत दुधसार करताना दूध फाटत कसे नाही असले बालिश प्रश्न तेंव्हा मनात यायचे नाहीत, जे समोर येतंय ते हणायचे असा तो काळ.
कालांतराने बापू गेला आणि या अनोख्या दुधसार डिश साठी प्रसिद्ध असणाऱ्या राधानगरीहून खास मसाला घेऊन माणूस येऊ लागला , मग तो दुधसार तयार करताना मी त्याच्या बाजूला घुटमळने हे आलेच,😁 पण तो पठ्या काही त्याने आणलेल्या खास मसाल्याच्या जवळ मला फिरकू द्यायचा नाही, व त्यातील जिन्नसही सांगायचा नाही त्यामुळे हा वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ स्वतः करायची मनातील इच्छा मनात असूनही अनेक वर्षे पूर्ण होऊ शकली न्हवती, पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग हमखास सापडतोच त्याप्रमाणे एक छोटी पायवाट मला सापडली झाले असे, बंधुराज गेले होते वर्षा पर्यटन साठी राधानगरीत, त्यांना तिथे कळले की दूधसार चा तयार कोरडा मसाला आता राधानगरीत उपलब्ध झाला आहे , माझे दुधसारप्रेम आमचे या लाडक्या शेंडेफळास माहीत असलेमुळे त्याने लगोलग मसाल्याची २ पाकिटे खरेदी केली व ती काल रात्री माझ्या हातात ठेवली ................मग रात भर सपनात दुधसारच दिसाल्त की वं😍😍😍 मग पुढं काय झालं ? हे फोटोत दिसायलाय ह्ये, आणि...........

पयला मसाला पाकीट आणायला राधानगरीला कुनाला तरी धाडायचं😉
एक कांदा बारीक चिरून शेंगतेलात परता, त्यात ३बटाटे बारीक तुकडे करून घाला, मग दोन चमचे तिखट आणि त्यो मसाला त्यात मिक्स करा , आणि एकलिटर दुध घाला , चांगल उकळीे येईस्तोवर ढवळा, बटाटा शिजला की तय्यार.
महत्वाचे मीठ घालायचे नाही खाताना वरून घालायच. वरून कोथिंबीर भुरभुरा आणि पावासोबत द्या दणका🤪😋😋

मी आपला चाटकी जीभ संघटना स्वयंघोषित अध्यक्ष
#प्रथमेशजोशी.9970105000#
#प्रथमेशजोशी.9970105000#
No comments:
Post a Comment