झटपट रवा आप्पे
साहित्य : एक वाटी रवा ,पाव वाटी
उडीद डाळीचे पीठ-, एक चमचा सायट्रिक अॅसिड (क्रिस्टल), अर्धा चमचा ईनोज फ्रूट सॉल्ट , एक चमचा आले लसूण
पेस्ट , पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, गरजेनुसार तेल,चवीनुसार मीठ,
आवश्यकतेनुसार ताक
कृती : प्रथम मिक्सरच्या
एका भांड्यात रवा,उडदाचे पीठ, ईनोज फ्रूट सॉल्ट,सायट्रिक असिड क्रिस्टल व चवीनुसार मीठ घालून फिरवून घ्यावे म्हणजे मिश्रण
चांगले एकजीव होईल .गॅसवर आप्पेपात्र गरम करत ठेवावे व ते गरम होईस्तोवर वरील तयार मिश्रणात ताक
घालून मिश्रण इडलीच्या पीठाइतपत घट्टसर भिजवावे ,आता यांत बारीक
चिरलेली कांदा,आलं-लसूण-मिरची पेस्ट तसेच बारीक चिरलेली
कोथींबीर घालून मिश्रण एकजीव करावे .
आता आप्पेपात्राला थोडे
तेल लावून त्यात वरील तयार मिश्रण चमच्याने घालावे व झाकण लावून ठेवावे एक बाजू चांगली खरपूस झाली
कि आप्पेपात्रासोबत मिळणाऱ्या काट्याने दुसरी बाजू उलटून घ्यावी व थोडे तेल सोडून
पुन्हा झाकण ठेवून दुसरी बाजूही खरपूस करून घ्यावी
No comments:
Post a Comment