Search This Blog

Tuesday, 24 July 2018

#ओनियन #रिंग्स

#ओनियन #रिंग्स
साहित्य : एक मोठा कांदा,एक चमचा मैदा,एक वाटी ब्रेड क्रम,पाव वाटी कॉर्न फ्लोअर,चिमूटभर बेकिंग सोडा,एक टेबलस्पून तेल,चवीनुसार मीठ,चवीपुरते लाल मिरचीचे तिखट,पीठ भिजवण्यापूरते पाणी,एक टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : कांद्याचे पातळ स्लाइस करून ठेवा. एका बाउलमध्ये मैदा,ब्रेड क्रम, कॉर्न फ्लोअर,मीठ,तिखट,बारीक चिरलेली कोथिंबीर व चिमूटभर बेकिंग सोडा एकत्र घेऊन त्यात थोडेसे पाणी घाला व भज्यांसाठी भिजवतो तेव्हढेच पातळ पीठ भिजवा.
गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा.तेलाला उकळी आली की आंच मध्यम करा. एका ताटात ब्रेड क्रम पसरा व कांद्याच्या स्लाइसणा सगळीकडे चोळून लावा आणि ते स्लाइस भिजवलेल्या भज्यांच्या पिठात बुडवून घेऊन पॅनमधील तेलात दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन रंगावर शॅलो फ्राय करून काढा.


आवडत्या चटणी सोबत सर्व्ह करा.

Sunday, 22 July 2018

झटपट #उपमा - #रेडी मिक्स

गेला आठवडाभर पावसामुळेबायो-गॅसचा अजिबातच वापर न केल्याने गॅस वाढून टाकी बरीच वर गेली होती. त्यामुळे आज उघडीप मिळताच गॅसचा पुरेपूर वापर करायचाच असे ठरवून घरात शिल्लक असलेला जवळपास दोन किलो रवा बायो-गसच्या मंद आंचेवर सोनेरी रंगावर बाजून घेतला व त्यातील एक किलो रावयाचा वापर करून उपम्याचे रेडी मिक्स पावडर करून ठेवली. आता आपल्याला हवे असेल तेंव्हा,कुणी पाहुणे भेटीला आले की आयत्यावेळी फक्त ५-१० मिनिटात त्यांन गरमा गरम उपमा करून देता येईल.
येथे हे उपम्याचे रेडी मिक्स कसे बनवता येते त्याची व त्यापासून बनवलेल्या उपम्याची अशा दोन्ही सचित्र रेसिपीज देत आहे.
झटपट #उपमा - #रेडी मिक्स


साहित्य : दोन वाट्या रवा ,एक कांदा,एक टोमॅटो,मटार दाणे,मूग व उडीद डाळ प्रत्येकी एक चमचा,शेंगदाणे अर्धी मूठ, फोडणीसाठी तेल,मोहरी,जिरे,हळद व हिंग, कढीपत्त्याची आठ-दहा पाने ,चविनुसार हिरव्या मिरचयांचे तुकडे,साखर,मीठ व लिंबाचा रस व सजावटीसाठी वरून घालण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर,ओल्या नारळाचा खवलेला चव व बारीक शेव.
कृती : आगोदर एका वाटीत पाणी घेऊन त्यांत मुगाची व उडदाची दाळ भिजत टाका.दुसर्‍या वाटीत पाणी घेऊन त्यांत मटार भिजत टाका. मग बायो गॅसच्या किंवा एल.पी.जी. चा गॅसवर मंद आंचेवर एका कढईत रवा सोनेरी रंगावर भाजून घ्या व एका परातीत काढून ठेवा. गॅसवर एका गंजात चार वाट्या पाणी गरम करायला ठेवा. कांदा व टोमॅटो चिरून घ्या. आता
उरलेले अर्धे कोरडे रेडी उपमा मिक्स गॅसवर एका कढईत घेऊन त्यावर तीन वाट्या उकळते पाणी घालून चांगले हलवा व झाकण ठेऊन एक वाफ काढून घ्या. झाला तुमचा उपमा तय्यार.
हे काचेच्या बाटलीत भरून ठेवलेले रेडी उपमा मिक्स महिनाभर सुद्धा छान टिकते. प्रवासात बरोबर घेतल्यास हवे तेंव्हा त्यावर फक्त उकळते पाणी टाकून हलवून घेतल्यास दोन तीन मिनिटात झटपट नाश्ता (उपमा) मिळू शकतो.
सर्व्ह करतेवेळ वरून ओल्या नारळाचा चव व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून द्या. असेल तर थोडी बारीक शेवही घालावी ,छान लागते.
गॅसवर काढईत फोडणीसाठी तेल तापवून घेऊन त्यांत मोहरी,जिरे,हिंग , हळद व हिरव्या मिरचयांचे तुकडे घाला व फोडणी झाल्यावर त्यांत कढीपत्त्याची आठ-दहा पाने टाकून परतवून घ्या मग त्यांत भिजलेली मुगाची व उडदाची डाळ टाकून परता,मग मटार दाणे व शेंगदाणे टाकून चांगले परतून घ्या, नंतर कांदा व टोमतोचा बारीक चिरलेल्या फोडी घालून परता,सर्वात शेवटी भाजून ठेवलेला रवा टाकून परता,परतत असतांनाच अखेरीस चवीनुसार साखर,मीठ व लिंबाचा रस घालून मिसळून घ्या. मिश्रण कोरडे होईतोपर्यंत परतत रहा. मिश्रण चांगले कोरडे झाल्यावर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून वर झाकण ठेवा व गॅस बंद करा. गार झाल्यावर त्यातील अर्धे रेडी उपमा मिक्स एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा. 

Thursday, 19 July 2018

ओवा-जिरे-तीळ यांचा #नमकिन #पराठा

ओवा-जिरे-तीळ यांचा #नमकिन #पराठा



साहित्य : गव्हाचे पीठ (कणीक), थोडेसे डाळीचे पीठ (बेसन), बारीक चिरलेली कोथिंबीर, तीळ, ओवा-जिरे पूड, तिखट, हळद आणि चवीपुरते मीठ. 

कृती : सर्वप्रथम एका ताटात गरजेनुसार गव्हाचे पीठ घ्या.त्यात अगदी थोडेसे डाळीचे पीठ घालून ते एकत्र करून घ्या.मग  त्यामध्ये ओवा-जिरे पूड, तिखट, हळद, तीळ आणि गरजेनुसार मीठ घालून ते पुन्हा व्यवस्थित मिसळून घ्या.त्यात थोडी कोथिंबीर बारीक चिरून घाला. गरज असल्यास त्यात थोडे पाणी घालू शकता. साधारण आपण पोळी करण्यासाठी कणीक मळतो, तशी ती आपल्या सोयीने मळून घ्या. या पीठातील लाडवा एव्हढा उंडा घेऊन या उंड्याचे पराठे लाटून ते छान खरपूस भाजून घ्या. 
गरम गरम खाल्ल्यास उत्तम. हे ओवा-जिरे-तीळ यांचे नमकिन पराठे लोण्याबरोबर खाल्ल्यास आणखी लज्जतदार लागतात.



Tuesday, 17 July 2018

#कुरडयांची #कोशिंबीर


साहित्य : अर्धी वाटी कुरडयांचा चुरा, एक वाटी दही,एक बारीक चिरलेला कांदा,अर्धा चमचा साखर,चवीनुसार मीठ,तडका फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा जिरे,चिमुटभर हिंग,एक बारीक चिरलेली हिरवी मिरची,५-६ कढीपत्त्याची पाने,
कृती : एका बाउलमध्ये कुरडयांचा चुरा गरम पाण्यात घालून दोन तास भिजत ठेवा.नंतर चाळणीतून गाळून जास्तीचे पाणी काढून टाकून एका बाउलमध्ये घेऊन त्यात दही,बारीक चिरलेला कांदा,चवीनुसार  बारीक चिरलेली हिरवी मिरची,मीठ व साखर घालून मिक्स करा. गॅसवर एका कढल्यात मोहरी,जिरे,हिंग  व कढीपत्त्याची पाने घालून तडका फोडणी करून ती या कोशिंबीरीवर ओता आणि कालवून घ्या. वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवून ही कुरडयांची कोशिंबीर सर्व्ह करा.


साहित्य : अर्धी वाटी कुरडयांचा चुरा, एक वाटी दही,एक बारीक चिरलेला कांदा,अर्धा चमचा साखर,चवीनुसार मीठ,तडका फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा जिरे,चिमुटभर हिंग,एक बारीक चिरलेली हिरवी मिरची,५-६ कढीपत्त्याची पाने,
कृती : एका बाउलमध्ये कुरडयांचा चुरा गरम पाण्यात घालून दोन तास भिजत ठेवा.नंतर चाळणीतून गाळून जास्तीचे पाणी काढून टाकून एका बाउलमध्ये घेऊन त्यात दही,बारीक चिरलेला कांदा,चवीनुसार  बारीक चिरलेली हिरवी मिरची,मीठ व साखर घालून मिक्स करा. गॅसवर एका कढल्यात मोहरी,जिरे,हिंग  व कढीपत्त्याची पाने घालून तडका फोडणी करून ती या कोशिंबीरीवर ओता आणि कालवून घ्या. वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवून ही कुरडयांची कोशिंबीर सर्व्ह करा.

टीप: कुरडयांत मुळचे मीठ असते म्हणून कोशिंबीरीची चव बघून मगच मीठ घाला,नाहीतर कोशिंबीर जास्त खारट होईल. गरम पाण्यात कुरडया भिजत घाल्यावर दोन तासांनी त्या फुगून त्यांचा आकार तिप्पट मोठा होतो हे लक्षात घेऊनच चुरा घ्यावा. 

Monday, 16 July 2018

#इन्स्टंट डोसा - #रेडी मिक्स

काल संध्याकाळी आम्ही घरीच डोशाची रेडी मिक्स पावडर (पीठ) करून ठेवले आणि आज सकाळी नाश्त्यासाठी डोसे,वाडगाव-शेरीच्या रत्नाकर जाधव सरांनी प्रेमाने भेट दिलेल्या शेवग्याच्या शेंगांचे आणि घरच्या बागेतील कढीपत्ता यांचा वापर करून ओल्या नारळाची चटणी केली होती.
येथे मी घरी बनवलेल्या डोसा रेडी मिक्स ची रेसिपी देत आहे. 

#इन्स्टंट डोसा - #रेडी मिक्स 

साहित्य : दोन वाट्या उडदाची डाळ ,एक वाटी चणा (हरबरा) डाळ,एक वाटी तुरीची डाळ,एक टेबलस्पून मेथीचे दाणे,सहा वाट्या तांदूळाचे पीठ,एक वाटी बारीक रवा, दोन चमचे पिठीसाखर, चवीनुसार मीठ,एक चमचा इनोज फ्रूट सॉल्ट.
कृती : उडदाची डाळ, चण्याची (हरबरा) डाळ, तुरीची डाळ, मेथी दाणे हे सर्व जिन्नस एकत्र एका मोठ्या पॅनमध्ये गॅसवर तापवून गरम करून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरच्या ग्राईंडर मध्ये बारीक पावडर करून घ्या. एका पॅन मध्ये तांदूळ पीठ व बारीक रवा एकत्र थोडा गरम करून घ्यावा. आता वरील सर्व साहित्य एकत्र करून कालवून घ्या आणि एका घट्ट झाकणाच्या हवाबंद बरणीत किंवा डब्यात भरून ठेवा.
इन्स्टंट डोसा रेडी मिक्स पीठ वापरुन डोसे बनवण्याची कृती : एका बाउलमध्ये दोन वाट्या इन्स्टंट डोसा रेडी मिक्स पीठ घ्या व त्यात पाणी घालून नेहमी डोश्यांसाठी ब्जिजवतो त्या कन्सिस्टंसीचे पीठ करून ते मिक्सरच्या लिक्विड जर मध्ये घालून दोन मिनिटे फिरवून घ्या आणि दहा मिनिटानंतर गॅसवर डोश्यांचा तवा तापवून घेऊन त्यावर डोसे घाला. सुरू केल्यापासून १५-२० मिनिटात डोसे तय्यार !