इंजी पुली(Injipuli) आल्याचे पंचामृत
इंजीपुली हे गडद तपकिरी गोड-आंबट आणि मसालेदार पंचामृत (लोणचे) आहे जे आले, चिंच, हिरवी मिरची आणि गूळ यांचे बनलेले असते जे प्रामुख्याने केरळमध्ये ओणमच्या वेळी बनवले जाते. ते तामिळनाडूच्या पाककृतीचा देखील एक भाग आहे. दक्षिण भारतातील केरळच्या काही भागात याला पुली इंजी असेही म्हणतात.
केरळ मध्ये ओणम असते त्यावेळी
"सद्या" बनवतात...सद्या म्हणजे नैवेद्य...ह्या नैवेद्यामध्ये आल्याचे
लोणचे असते ते म्हणजेच इंजी पुली...
कृती : इंजी पुली साठी १वाटीभर आलं बारीक
चिरून घ्यावे.
शक्यतो नोनस्टिक पॅन वापरावे.
(केरळ कडे नारळाचे तेल वापरतात आपण दुसरे कुठलेही वापरले तरी चालेल फक्त
मोहरीचे वापरू नये)
तेल गरम करून त्यात थोडी मोहरी,बारीक चिरलेल्या २हिरव्या मिरच्या,२
सुक्या लाल मिरच्या तुकडे करून,
भरपूर कढीपत्ता आणि बारीक चिरलेलं आलं
घालूनचांगले परतून घ्यावे.परतून आल्याचा रंग तपकिरी झाला की त्यात अर्धी वाटी चिंचेचा कोळ
घालावा.१--१.५ वाटी पाणी घालून मंद आचेवर उकळत ठेवावे.पाणी अर्धे आटले की हळद,थोडे लाल तिखट,मीठ व १/२ ते पाऊण वाटी गुळ घालावा.लोणचे
घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवावे.थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवावे.
%20%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%87%20.jpg)
No comments:
Post a Comment