#बटाटा_साबुदाणा_भगर_शिंगाडापीठ_थालीपीठ
साहित्य:
भगर (वरी), साबुदाणा,उकडलेला बटाटा,शिंगाडा पीठ ,हिरवी मिरची,जिरे,मीठ (उपवासाचे),कोथिंबीर (पर्यायी)
साजूक तूप
कृती:
तयारी: भगर आणि साबुदाणा एकत्र भिजत ठेवा. बटाटा
उकडून किसून घ्या. मिरची आणि जिरे वाटून घ्या.
भिजलेली
भगर आणि साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यात किसलेला बटाटा, शिंगाड्याचे पीठ,वाटलेली मिरची-जिरे, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून
चांगले मिसळा.
थालिपीठासाठी तवा गरम करून त्यावर साजूक तूप लावा. मध्यम
आचेवर तव्यावर थालीपिठाचा गोळा ठेवून हाताने
गोलाकार थापा. गोळावर माहीभागी एक आणि गोलंकारबाजूवर बोथानेतेन भोके पाडून त्यात साजूक
तूप सोडा.
थालिपीठावर १-२ मिनिटे झाकण ठेवा. झाकण काढून
खालची बाजू भाजली असल्यास थालीपीठ पलटून घ्या. दोन्ही बाजूंनी खापुस भाजून झाल्यावर
थालीपीठ सर्व्ह करा. सोबत खाराची मिरची किंवा लोणी अथवा गोडसर दही ड्या.

No comments:
Post a Comment