
तेंव्हा पासून डॉक्टरांनी माझ्या गोड खाण्यावर बंदी घातली आहे.
पण गेली २० वर्ष माझा मधुमेह मी नियंत्रित ठेवलेला आहे.
एका मधुमेहावरील चर्चे दरम्यान डॉ. ह.वि. सरदेसाई ह्यांना मी माझी ही 'गोड' समस्या सांगितल्यावर त्यांनी मला असे सुचवले की ,तुम्हाला जर गोडा शिवाय चालतच नसेल तर 'देवाला जसे तुम्ही एका छोट्या चांदीच्या वाटीतून 'नैवेद्य' दाखवता तसे अगदी छोट्या वाटीतून श्रीखंड,बासुंदी,खीर किंवा एखादा अगदी छोटा गुलाबजाम अथवा डॉलर जिलबी खात जा.आणि त्याची भरपाई म्हणून तुम्ही जेवणात अर्धी पोळी कमी खा व मागचा भात खाऊ नका. शिवाय अर्धा तास जास्त चाला.
या सल्ल्यानुसार मी गेली अनेक वर माझी 'गोडाची' आवड पुरेपूर भागवत असतो.
त्यासाठी आम्ही घरी मुद्दाम काहीतरी गोडाचे पदार्थ बनवत असतो किंवा विकत आणून ठेवत असतो.
आज मी हट्टाने घरीच 'गोडाची पाकातली बुंदी' बनवली आहे.
त्याचीच ही सचित्र रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
घरीच अशी बनवा गोड पाकातली बुंदी
गोड आणि रसाळ बुंदी बनवण्यासाठी प्रथम साखरेचा पाक तयार करा. एका पातेल्यात पाणी घाला आणि
उकळी येऊ द्या.
पाणी उकळू लागल्यावर त्यात साखर, वेलची ठेचून केशर घालून मिक्स करा. साखर पूर्णपणे विरघळली
की मंद आचेवर ठेवा.
बुंदीसाठी पाक गुलाबजाम सारखाच करावा.
यानंतर बुंदी बनवण्याची तयारी करा. चाळलेले बेसन एका मोठ्या भांड्यात घ्या. यानंतर त्यामध्ये बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घालून कोरडेच चांगले मिक्स करून घ्या व नंतर जरूरी नुसार पाणी घालून मिक्स करा.
गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवा/ तेल चांगले गरम झाल्यावर कढईवर एका हाताने चाळणी किंवा झारा पकडून दुसऱ्या हाताने चमच्याने त्यावर पीठ घालात रहा. कहाणी/झाऱ्याच्या भोकातून कढई तल्या तेलात बुंदी पाडा व सोनेरी रंगावर तळून काढा आणि बुंदी गार झाल्यावर पाकात घाला.
No comments:
Post a Comment