पूर्णालू
खूप छान पदार्थ आहे.
तेलुगू लोकांच्यात सणा-सुदीला हा पारंपारिक
पदार्थ मिष्टान्न म्हणून आवर्जून केला जातो.
नेहमीपेक्षा थोडंसं घट्टसर
डोश्याचं पीठ भिजवायच आणि त्यात पुरणाचा गोळा त्यात बुडवून शुद्ध तूपात 'पूर्णालू' तळा.
मऊ शिजलेल्या हरभरा डाळीमध्ये गूळ आणि वेलची पावडर घालून घट्ट
पुरणाचा गोळा बनवून ठेवा.
आता दुसरीकडे चार तास आधीच
भिजवून ठेवलेल्या उडदाच्या डाळीच्या पिठात
तांदूळाची पिठी व चवीपुरते मीठ घालून सैलसर
पीठ भिजवून घ्या. (तयार डोश्याचे पीठ वापरले तरी चालेल किवा उडीद डाळ
तांदूळ भिजवून नेहमिसारखे पीठ बनवले तरी हरकत नाही)
आता गॅसवर एका पॅनमध्ये
तूप तापवून त्यात घट्ट पुरणाचे लिंबाएव्हढे आकाराचे गोळे करून ते डोश्याच्या पिठात
बुडवून घ्या आणि तापलेल्या तुपातून तळून काढा.
No comments:
Post a Comment