Search This Blog

Monday, 9 April 2018

चटकदार क्रिप्सी मटकी भेळ



साहित्य : सोलापुरी चुरमुरे (मुरमुरे), शेव, पापडी, खारीबुंदी, शेंगदाणे,एक मोठा बारीक चिरलेला  कांदा, एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमाटो, एक  छोटी काकडी (किसून) , चवीनुसार बारीक चिरून हिरव्या मिरच्या , एक वाटी वाफवलेली मोड आलेली मटकी,मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , अर्धी लिंबाची फोड , कांद्याच्या फोडी.
कृती : सोलापुरी चुरमुरे, शेव, पापडी, खारीबुंदी, शेंगदाणे हे सगळे पदार्थ एका मोठ्या आकाराच्या स्टीलच्या थाळ्यात किंवा परातीत  एकत्र केले जातात. स्टीलच्या थाळ्यात किंवा परातीत  हे सगळे पदार्थ एकत्र करतानाच मधल्या भागात शेव, पापडी, खारीबुंदी, तळलेले शेंगदाणे हे पदार्थ जास्त राहतील आणि प्लेटच्या कडेने चुरमुरे येतील, असे बघितले जाते.
दुसरीकडे गॅसवर मोठ्या पातेल्यात मोडाची मटकीचा झणझणीत रस्सा उकळत ठेवलेला असतो. भेळ सर्व्ह करतेवेळी प्लेटमधील फरसाण असलेल्या भागावर डावभर उकळत ठेवलेला गरमागरम मटकीचा झणझणीत रस्सा टाकला जातो. त्यानंतर त्यावर कांदे-लसणाचा मसाला पेरून पुन्हा थोडी शेव टाकली जाते. पातल्यातील मटकीचा झणझणीत रस्सा यांचा आणखी एक थर भेळेवर टाकल्यानंतर त्यावर कोथिंबीर, लिंबाची फोड , उकडलेली मिरची आणि चिरलेला कांदा यांच्यासह ती सर्व्ह करा.

No comments:

Post a Comment