Search This Blog

Friday, 13 April 2018

चटपटे सोया क्रंच

चटपटे सोया क्रंच





साहित्य : १५-२० सोयाबीन चंक्स , एक ढोबळी (सिमला) मिरची , अर्धी वाटी हिरव्या मटारचे दाणे , एक मोठा टोमॅटो बारीक चिरून , एक मोठा कांदा बारीक चिरून , चवीनुसार हिरव्या मिरचयांचे तुकडे व मीठ , एक चमचा आले-लसूण पेस्ट , अर्धा चमचा प्रत्येकी धने-जिरे पावडर , आधा चमचा लिंबाचा रस , अर्धा चमचा चाट मसाला , बारीक चिरलेली कोथिंबीर , पनीरचे ८-१० बारीक तुकडे.

कृती :  सोया चंक्स धुवून घ्या व चिमूटभर मीठ घालून प्रेशर  कुकरमधून शिजवून घ्या . कुकरमधून शिजवून घेतल्यावर हाताने दाबून पाणी काढून टाका व बाजूला ठेवा. गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात जिरे,हळद व हिंग घालून एक मिनिट फोडणी परतून घेऊन मग त्यात कांदा घालून पुन्हा पांच मिनिटे परतून घ्या. मग आले-लसूण पेस्ट व धने-जिरे पावडरव चाट मसाला  घालून पुन्हा दोन मिनिटे परता. कांद्याचा रंग सोनेरी झाला की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो ,बारीक चिरलेली ढोबळी सिमला मिरची , पनीरचे बारीक तुकडे व हिरवे मटाराचे दाणे घालून  शिजवून घ्या. शेवटी लिंबाचा रस व चवीनुसार मीठ घाला. गॅस बंद करून वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पांच मिनिटे झाकून ठेवा.


No comments:

Post a Comment