सोलाणा हरभर्याची आमटी
सोलाणा
हरभरे छानपैकी तेलावर परतून व वाफेवर शिजवून घ्यायचे आणि नंतर त्यात आवडीनुसार कांदा,लसूण, हिरवी मिरची,जिरे,सुके खोबरे तेलावर परतून घेऊन एकत्र मिक्सरवर वाटून फोडणीला टाकायचे आणि उकळी आली की चवीनुसार मीठ घालायचे.
वाटण शिजलेसे वाटले की गॅस बंद करून बारीक
चिरलेली कोथिंबिर घालून वर झाकण म्हणून ताट ठेवून द्या.
आमटी
झाली.आता आमटीबरोबर भाकरीच हवीच , शिवाय खर्डा तर हवाच हवा.असा हरभर्याची आमटी,खर्डा, फोडलेला कांदा,घरचं दही,पंचपक्वानाला मागे सारेल असा चटपटीत आणि फर्डा बेत .
No comments:
Post a Comment