Search This Blog

Wednesday, 12 July 2017

असा शिजवा वरण-भात

असा शिजवा वरण-भात



 गृहिणींनी संध्याकाळी ४-४.३० च्या सुमारास डाळ, तांदूळ धुऊन कुकर तयार करुन ठेवायचा आणि साधारण वाजता मोठ्या आचेवर गँस ठेवायचा, साधारणत: १०मिनिटांनी वाफेचा दाब तयार होतो तेंव्हा गँस मंद आचेवर आणून पुन्हा १० मिनिटे ठेवायचा आणि नंतर बंद करायचा. शिट्टी अजिबात होऊ द्यायची नाही. नोकरदार भगिनींनी सकाळी धान्य धुवून त्यात आवश्यक पाणी घालून फ्रीजमध्ये ठेऊन जावे. संध्याकाळी परतल्यावर ते बाहेर काढून ठेऊन रम टेंपरेचरला येऊ द्यावे मग वरीलप्रमाणेच कृती. ह्यामुळे इंधन बचत, वेळेची बचत तर होतेच पण अन्नही मस्त शिजते, वरण हाटावे लागतच नाही. ह्याच पद्धतीने brown rice ही उत्तम शिजतो. प्रयोग करुन पहा तर!


No comments:

Post a Comment