कच्च्या केळ्यांचे कटलेट्स
साहित्य: दोन कच्ची
केळी,एक उकडलेला बटाटा, अर्धी वाटी साबुदाणा,पाव वाटी उपासाची
भाजणी, पाव वाटी शेंगदाण्याचे जाडसर कूट, चवीनुसार २-३
हिरव्या मिरच्या + अर्धा चमचा जिरे + मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर यांची पेस्ट, अर्ध्या लिंबाचा
रस, चवीनुसार मीठ,तळणीसाठी आवश्यकतेनुसार तूप किंवा तेल.
कृती: एका चाळणीत साबुदाणा
घेऊन पाण्याने धुवून त्यातील पाणी काढून टाकावे व ४ तास झाकून ठेवावा.
साबुदाणा निट भिजला
की कच्ची केळी सोलून किसून घ्यावीत. नंतर भिजवलेला साबुदाणा, केळ्यांचा कीस , उकडून कुस्करलेला
बटाटा, उपासाची भाजणी,
शेंगदाण्याचे कूट, हिरव्या मिरचीची पेस्ट, लिंबाचा रस, आणि मिठ एकत्र
करावे. निट मळून गोळा तयार करावा. या गोळ्याचेएक सारख्या आकाराचे गोळे करून ठेवा.
एकेक गोळा घेऊन त्याचे मध्यम आकाराचे कटलेट बनवावे. आवडीप्रमाणे आकार द्यावा.
गॅसवर एका कढईत तेल
किंवा तूप गरम करावे. तयार कटलेट मध्यम आचेवर तळून काढावे.
No comments:
Post a Comment