ज्वारीचे बिबडे (पापड)
साहित्य- एक किलो
ज्वारी, २०-२५
लसणाच्या पाकळ्या, चार चमचे जिरे, चार
चमचे तीळ, दोन वाट्या मीठ ,तिखट पाऊण
चमचा.
कृती- ज्वारी तीन
दिवस भिजट घालावी. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चांगली धुवावी व मिक्सरवर दळावी.
सकाळी लसूण व जिरे वाटावे. जेवढे वाटलेली ज्वारी असेल त्याच्या दुप्पट पाणी गरम
करत ठेवावे.
पाणी उकळल्यावर
(घाटा शिजेल अशी पातेली घ्यावी) त्यात मीठ व वाटलेली लसूण, जिरे, तीळ, तिखट घालावे. नंतर वाटलेले ज्वारीचे पीठ हळूहळू सोडावे, पीठ इडली पिठासारखे असावे. ते हलवत राहावे. पिठास बुड-बुडे आल्यासारखे दिसले
की पीठ शिजले असे समजावे. मग पोळपाटावर
ओला रुमाल करून त्यावर पळीभर पीठ घालून हाताला पाणी लावून पातळ थापावे व उन्हात
एका प्लास्टीकच्या कागदावर तो रुमाल उचलून त्यावर तो पापड हळूच ठेवावा. हे न
जमल्यास पळीने प्लास्टीक कागदावर गोल आकारात पसरावे. वाळल्यावर उलटे करून पापड
काढावे व परत वाळवावे. तळून- भाजून खावे.
No comments:
Post a Comment