कलिंगडाच्या सालींचा ज्यूस (वेलकम ड्रिंक)
साहित्य: ४-५
वाट्या कलिंगडाच्या सालींचे मध्यम आकाराचे
तुकडे ,
अर्धी वाटी संत्र्याचा ज्यूस (आवडीप्रमाणे कमी जास्त करावा ,संत्र्यातीलही बिया काढून टाकाव्यात),एक चमचा
लिंबाचा रस ,अर्धा चमचा सैंधव (काळं) मीठ,अर्धा चमचा आल्याचा
कीस,एक छोटा चमचा चाट मसाला,बर्फाचे
तुकडे (ऐच्छिक)
कृती :
मिसरच्या ब्लेंडरच्या भांड्यात
कलिंगडाच्या सालींचे तुकडे,,संत्र्याचा ज्यूस, लिंबाचा रस,काळं
सैंधव मीठ, आल्याचा कीस व चाट मसाला
घालून मिक्सरवर फिरवून ब्लेंड करावे. एकजीव झाले की सर्व्हिंग बाउळ्स किंवा
ग्लास मध्ये बर्फाचे तुकडे घालून त्यावर ज्यूस ओतावा. आणि गारच सर्व्ह करावा.
टीप : सर्व्ह करतेवेळी ज्यूसमध्ये सजावटीसाठी
कलिंगडाचे बारीक तुकडे वरून टाकावे.
No comments:
Post a Comment