Search This Blog

Monday, 8 May 2017

नाचणीचे पापड





नाचणीचे पापड



 




बाजारात उपलब्ध असणाऱ्या नेहमीच्या प्रकारातील उडीद पापडांप्रमाणे नाचणीपासून पापड तयार करता येतील.
साहित्य : १ किलो नाचणी, ३० ग्रॅम पापडखार, २-३ टीस्पून हिंग, पाऊण वाटी मीठ
कृती : नाचणी धुवून चांगली वाळवावी व दळून आणावी. पिठात हिंग, पापडखार, मीठ चांगले मिसळावे.
जेवढे पीठ तेवढेच पाणी उकळत ठेवावे. पाण्याला उकळी आल्यावर पीठ घालून चमच्याने चांगले एकत्र करावे
व मंद गॅस वर १-२ मिनिटे वाफ आणावी व लगेच पीठ परातीत घेऊन गरम गरमच पाण्याच्या हाताने चांगले
मळावे व गोळ्या करून पापड लाटावेत.

टीप : पापड तिखट हवे असल्यास    मिरची पावडर घालावी.

No comments:

Post a Comment