बटाटा पुर्या
कृती : प्रेशरकुकरमधून बटाटे उकडून घ्यावेत.कुकरमधून काढल्यावर सोलून गरम असतानाच बटाट्यांचा पूरणयंत्रावर लगदा करून ठेवा किंवा किसणीवर किसून ठेवा.
एका परातीत हा बटाट्याचा लगदा किंवा कीस घेऊन त्यात कणिक,ज्वारीचे पीठ,बेसन,तांदूळाची पिठी,हळद,लाल तिखटाची पावडर, मीठ ,हिरव्या मिरच्यांचा ठेचा, जिरेपूड, तीळ,ओवा,मलईचे घट्ट ताजे दही घालावे व लागेल तसे पाणी घालून पुर्यांसाठी घट्ट पीठ मळावे.तेलाचे मोहन घालून पुन्हा मळावे. १५-२० मिनिटे ओल्या सूती कपड्याने झाकून बाजूला ठेवावे. १५ मिनिटांनी कपडा काढून पुन्हा एकदा पीठाला तेलाचा हात लावून कणिक मळतो तसे मळून घ्यावे. परातीला पीठ चिकटता कामा नये.
या मळून घेतलेल्या पिठाचे लिंबाएव्हढे गोळे करून ठेवावेत. एकेक गोळा लाटून बेताच्या आकाराच्या पुर्या लाटून तळावे व आपल्याला आवडत्या लोणचे किंवा, चटणी बरोबर सर्व्ह करा
No comments:
Post a Comment