मलई पनीर कोफ्ता
साहित्य : २-३
उकडलेले बटाटे,२५०
ग्रॅम पनीर,चवीनुसार मीठ, २-३
टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर ,फिलिंगसाठी १०-१२ काजूचे तुकडे व
१०-१२ बेदाणे,तळणीसाठी गरजेनुसार तेल
ग्रेव्हिसाठी
साहित्य : ६-७ टोमॅटो,आल्याचा छोटा तुकडा,१०-१२
काजूच्या पाकळ्या,१०-१२ मकाणे,वाटीभर
फ्रेश क्रीम,अर्धी वाटी दूध,चवीनुसार
मीठ,अर्धा चमचा जिरे,२-३ टेबलस्पून तेल,एक वाटी दही,२-३ लाल सुक्या मिरच्या,एक छोटा चमचा हळद,एक चमचा गरम मसाला,अर्धी मूठ चिरलेली कोथिंबीर,सजावटीसाठी फ्रेश क्रीम.
कृती :
कोफ्त्यासाठी एका बाउलमध्ये उकडलेले बटाटे, पनीर,चवीनुसार
मीठ, कॉर्नफ्लॉवर घ्या व
त्यात थोडेसे तेल आणि जरूरी पुरते पाणी घालून कुस्करून व मळून घेऊन त्याचे पिठाचा घट्ट
गोळा बनवा. मग त्या पिठातून छोटे लिंबाएव्हढे गोळे घेऊन त्यात काजूचे तुकडे व बेदाणे
घालून छोटे छोटे कोफ्ते बनवून घ्या व एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊन त्यात ते
कोफ्ते शॅलोफ्राय करा.
ग्रेव्हिसाठी काजूच्या
पाकळ्या अर्धी वाटी दुधात अर्धा तास भिजत
घालून ठेवा व नंतर मिक्सरच्या भांड्यात भिजत घातलेल्या काजुच्या पाकळ्या,चिरलेले टोमॅटो,दूध,मकाणे व आल्याचा तुकडा घालून वाटून त्याची पेस्ट बनवा.
आता एका कढईत
फोडणीसाठी तेल गरम करून घ्या व त्यात जिरे टाकून ते तदतडल्यावर मग त्यात
टोमॅटो-काजूची पेस्ट घाला व ब्राऊन रंगावर परतून घ्या. परतून घेत असतांना काढाईला
सगळीकडून तेल सुटायला लागले की त्यात लाल सुक्या मिरच्या,चवीनुसार मीठ,धने पूड व हळद
घालून थोड्या वेळ परता आणि मग त्यात दही,फ्रेश क्रीम , थोडेसे पाणी व डाळ घाला आणि ५-७ मिनिटे शिजवा. नंतर त्यात टाळून ठेवलेले
कोफ्ते घाला व २-३ मिनिटे शिजवून घेऊन गॅस बंद करा.
सर्व्हिंग
बाउल्समध्ये मलई पनीर कोफता काढून घेऊन त्यावर फ्रेश क्रीम आणि चिरलेल्या
कोथिंबीरीने सजावट करून सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment