अनारकली भेळ
साहित्य : चार
वाट्या जाड पोहयांचा चिवडा , दोन वाट्या डाळींबाचे दाणे,एक वाटी बारीक चिरलेली
कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा,बारीक
चिरलेल्या मिरच्या,एक चमचा चाट मसाला,सैंधव मीठ,एक टेबलस्पून लिंबाचा रस,चिंच-खजूर-गूळ यांची आंबट
गोड रसदार चटणी
कृती : एका ताटात जाड पोहयांचा चिवडा घ्या,त्यात डाळिंबांचे दाणे मिसळा,
त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर-बारीक चिरलेला कांदा-बारीक चिरलेल्या मिरच्या-चाट
मसाला-सैंधव मीठ आणि लिंबाचा रस व चिंच-खजूर-गूळ
यांची आंबट गोड रसदार चटणी घाला आणि चमच्याने हलवून छान मिसळून घ्या.
चटकदार आणि नांव
काढताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली अनारकली भेळ तय्यार झाली आहे.
No comments:
Post a Comment