अंकुरीत मुगाचं सूप
साहित्य एक वाटी अंकुरीत (मोड आलेले) अख्खे
हिरवे मूग, एक मोठा कांदा, २-३ लसणाच्या पाकळ्या, चार वाट्या पाणी, चवीनुसार मीठ, सुपावर वरून घालायला
थोडंसं लोणी.
कृती : हिरवे अख्खे मूग भिजत घालून त्यांना अंकुरीत
(मोड) करून घ्या. अंकुरीत मूगात कांदा व लसूण घालून प्रेशर कुकर मधून शिजवून घ्या आणि मिक्सरला वाटून पेस्ट बनवून
घ्या. त्यात पाणी व चवीनुसार मीठ घालून उकळा. वरून लोणी घालून प्यायला द्या.
पाण्याचं प्रमाण आवडीनुसार वाढवा.
याच पद्धतीनं अंकुरीत अख्ख्या मसूराचेही सूप करता येईल.
No comments:
Post a Comment