Saturday, 3 December 2016

ग्रीन अ‍ॅपल अचार

ग्रीन अ‍ॅपल अचार


खरं सांगू का ? लोणचे हा माझा वीक पॉइंट आहे. लोणच्या वाचून माझे असते. मला कोणतीही प्रकारचे लोणचे खूपच आवडते. तसेच कोणत्याही ऋतुत मला लोणचे खाल्लेले चालते.
ग्रीन एप्पल अचार हे एक गुजराथी पद्धतीचे इन्स्टंट आचार आहे. हे अतिशय कमी वेळात होणारे झटपट आचार आहे. फ्रिजमध्ये ठेवल्यास हे आचार महिनाभरही ताजयासारखे टिकते.
साहित्य : दोन मोठ्या ग्रीन एप्पलचे बारीक चिरलेले तुकडे,चवीनुसार मीठ,लाल मिरचीचे तिखट,एक छोटा चमचा हिंग,एक चमचा मेथीच्या दाण्यांचे भरड कूट,एक चमचा फेटलेली मोहरी,चार टेबलस्पून तेल,एका लिंबाचा रस.
कृती : एका मोठ्या बाऊलमध्ये वर दिलेले सर्व घटक पदार्थ एकात घेऊन छान कालवून मिक्स करा. एका घट्ट झाकणाचा बरणीत भरून ४-५ दिवस मुरत ठेवा.
५ दिवसांनी मुरलेले आचार खायला घेऊन शकता.

No comments:

Post a Comment