Search This Blog

Monday, 5 December 2016

तवा पनीर



तवा पनीर 

साहित्य : चार वाट्या पनीरचे १”x१”  आकाराचे चाकोनी काप,एक बारीक चिरलेला कांदा,दोन बारीक चिरलेले टोमाटो,४-५ सिमला मिरच्या- बारीक चिरून ,एक छोटा चमचा हळद,एक चमचा तिखट,एक छोटा चमचा प्रत्येकी जिरे-धने पूड
एक छोटा चमचा आमचूर पावडर,चवीनुसार मीठ,आवश्यकतेनुसार तेल.
कृती : गॅसवर एक तवा गरम करून घीऊन त्यावर पनीरचे तुकडे तेलावर परतून घ्या व एका बाउलमध्ये काढून ठेवा. मग त्याच तेलात कांदा, गुलाबी रंगावर भाजून घ्या व बाजूला ठेवा. आता त्याच तेलात ढोबळी मिरची भाजून बाजूला ठेवणे.
नंतर त्याच तेलात टोमाटो घालुन पूर्णपणे शिजवणे.मग त्यात तिखट, हळद, जिरे पूड, धने पूड आणि आमचूर पूड घालुन २-३ मिनिट परतत शिजवणे.आता त्यात तेलावर परतून ठेवलेले पनीर, कांदा, ढोबळी मिरची आणि मीठ घालुन चांगले एकत्र करणे व ४-५ मिनिट शिजवून गरम तवा पनीर गरम सर्व्ह करा

No comments:

Post a Comment