मिश्र भाज्यांचे लोणचे
साहित्य : एक वाटी श्रावण घेवडा (फरसबी) , एक वाटी बाइक चिरलेल्या गाजराच्या फोडी,एक वाटी फ्लॉवरचे
निवडलेले तुरे,एक वाटी बारीक चिरलेली ओली हळद, एक वाटी मटार चे दाणे, एक वाटी बारीक चिरलेली सिमला
मिरची , दोन वाट्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या . (
ह्या सर्व भाज्या धुवन, पुसुन, कापून
जरा सुकवून घ्यायाच्या आहेत )
खारासाठी मसाल्याचे
साहित्य : दोन चमचे हिंग, दोन चमचे हळद, एक चमचा लाल तिखट, ४-५चमचे मीठ, सहा लिंबांचा रस, ३ चमचे साखर, ५० ग्राम कोणताही तयार लोणचे मसाला,
५ चमचे चांगले फेतलेली मोहरी, ५ चमचे तळलेले मेथी
दाणे, ५ चमचे बडीशेप, १० ते १२ लवंग,
१० ते १२ मीरे, ७ ते ८ दालचीनी काड्या,
२ ते ३ वाट्या तेल.
कृती : प्रथम एका परातीत वर दिलेल्या सगळ्या भाज्या
एकत्र घेऊन हाताने कालवून मिक्स करा.मग त्यात तयार लोणचे मसाला,
मीठ, हळद, लिंबांचा रस,
साखर ,लाल तिखट घाला आणि पुन्हा एकदा व्यवस्थित
कालवून मिक्स करा.
गॅसवर एका कढईत तेल
कांगले कडकडीत गरम करा, त्यात लवंग, मिरी दालचीनी घाला,
मग त्यात मेथी, मोहरी, बडीशेप
घाला, हे सार तडतडले की गॅस बंद करा आणि मग हिंग घाला.
आता ही फोडणी थंड
झाली की भाज्यांवर घाला आणि एकत्र मिक्स करा.
टिप्स :
१.
या
मिक्स लोणच्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेवू शकता.
२.
फ्रिज
मधे ठेवल्यास हे लोणचे ६ महीने पर्यन्त
छान टिकू शकते.
३.
फोडणीतील
तेल सगळ्या भाज्यांच्यावर आले पाहिजे.
No comments:
Post a Comment