Thursday 13 October 2016

फोडणीच्या शेवया

फोडणीच्या शेवया

साहित्य : दोन वाट्या भरून गणेश हातशेवया – कुस्करुन , दोन चमचे शेंगदाण्याचे कूट, तेल, चवीनुसार ३-४ हिरव्या मिरचयांचे बारीक तुकडे , मीठ व साखर- एक चमचा लिंबाचा रस , मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , जिरे व मोहोरी
कृती : प्रथम कढईत शेवया चांगल्या लालसर रंग येइपर्यंत कोरड्याच भाजून घ्याव्यात व एका परातीत (अथवा ताटात) खाली पेपरचा एकेरी कागद पसरून काढून घ्याव्यात. (पेपर न टाकल्यास त्या खाली ताटाला चिकटून बसतात)
मग गॅसवर कढईत तेलाची खमंग फोडणी करून तीत मिरच्या, जीरे , मोहोरी व हिंग घालून शेवटी भाजून घेतलेल्या शेवया घालाव्यात. पुन्हा नीट परतून, बेताबेताने गार पाणी घालावे (सर्व शेवया बुडतील इतपत). नीट हलवून घेऊ कढईवर झाकण ठेऊन दरदरून एक वाफ येऊ द्यावी. मग वरून दाण्याचे कूट, चवीनुसार मीठ, साखर, लिंबाचा रस घालून पुन्हा व्यवस्थित हलवून मिक्स करावे व दणदणीत वाफ काढावी. सर्व शेवया एक एक धागा दिसली पाहीजे, गिच्च गोळा होता कामा नये. शेवया मऊ, मोकळ्या शिजल्या पाहीजेत. खायला देताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून व सोबत लिंबाची फोड देऊन सर्व्ह करा. .

No comments:

Post a Comment