Search This Blog

Friday, 7 October 2022

गव्हाचे सत्व

 

गव्हाचे सत्व 

 

गहू  दोन दिवस पाण्यात भिजवून तिसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.खूप बारीक नको. जास्त पाणी घालून हाताने दाबून चोथा वेगळा करावा. पाणी गाळून सेट होऊ द्यावे. नंतर वरचे पाणी काढून घट्ट चीक  दोन दिवस उन्हात वळवावा. 

त्याची पावडर करून ठेवावी. 

वर्षभर कॉर्नफ्लोर ला पर्याय  म्हणून वापरू शकतो. 

याचा वापर करून केलेले कटलेट कॉर्नफ्लोर वापरुन केलेल्या कटलेटपेक्षा जास्त क्रिस्पी होतात.


Monday, 19 September 2022

झटपट कांद्याची झणझणीत चटणी

 


झटपट कांद्याची झणझणीत चटणी

 

रोज जेवणामध्ये किंवा डब्यात जर  तेच-तेच खाऊन कंटाळला असाल तरबदल म्हणून  घरच्या घरी तयार करा कांद्याची झणझणीत चटणी

साहित्य : दोन मोठ्या आकाराचे कांदे, चवीनुसार ४-५  लाल मिरच्या, एक चमचा चिंचेची पेस्ट, चार चमचे तेल, तीन चमचे मोहरी, अर्धा चमचा उडदाची डाळ, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, मीठ चवीनुसार.

कृती :

कांदा बारीक चिरून घ्या . एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करा. त्यामध्ये कांदा चांगला भाजून घ्या. त्यात लाल मिरची टाकून भाजून घ्या. त्यानंतर यामध्ये चिंचेची पेस्ट टाकून परतून घ्या. थंड झाल्यानंतर कांद्याचे मिश्रण बारीक वाटून घ्या. आता एका कढल्यात दोन चमचे तेल गरम करा. त्यात मोहरी, उडदाची डाळ, ५-७  मेथीचे दाणे, कढीपत्ता, हिंग आणि मीठ टाकून तडका तयार करा आणि  तो चटणीवर टाकून सर्व्ह करा.

Sunday, 21 August 2022

नासी केराबू (Nasi Kerabu) निळ्या गोकर्णीच्या फुलांचा फ्राइड राईस

 

नासी केराबू (Nasi Kerabu)

निळ्या गोकर्णीच्या फुलांचा फ्राइड राईस 

 




नासी केराबू ही एक  मलेशियन पारंपरिक निळ्या रंगाच्या फ्राइड-राईसची  (भाताची)  लोकप्रिय डिश आहे.

भात शिजवतांनाच त्यात तांदूळ व पाण्या सोबत निळ्या  गोकर्णीच्या फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. निळ्या गोकर्णीच्या पाकळ्यांमुळे भाताला उत्तम निळारंग व स्वाद येतो.

नंतर हा शिजवलेला निळ्या रंगाचा  भात एका परातीत काढून घेऊन हाताने मोकळा करून ठेवतात. दुसरीकडे गॅसवर एका पॅन मध्ये फोडणीसाठी तेल+तुप गरम करून घेऊन त्यात  आले-लसुणाची पेस्ट,जिरे,हिरवी मिरची,कढी पत्त्यांची पाने,कोथिंबीर,पुदिना व मीठ यांचे मिक्सरवर केलेले वाटण घालून थोडेसे परतून घेऊन नंतर त्यात तो मोकळा केलेला भात घालून चांगले परतून घेतात.

सॅलड व उभी चिरलेली कोबीची पाने यांनी गार्निश करून सर्व्ह करा.

 

Tuesday, 14 June 2022

स्वयंपाक घरातील उपयुक्त टीप :

 स्वयंपाक घरातील उपयुक्त   टीप :


चकल्या, शेवेचा घाणा, वडे,भजी,पुऱ्या,पापड,शंकरपाळी, असे कोणतेही तळण काढतांना एका परातीत पातळ पोहे घेऊन त्यावर हे तळण काढावे .
त्यातील अतिरिक्त तेल पोहे शोषून घेतात आणि पदार्थ तेलकट होत नाही.

नंतर हे तेलयुक्त पोहे खमंग भाजून त्याचा चिवडा करता येतो.

Monday, 13 June 2022

फ्रिजचा वास जाण्यासाठी काही उपाय

 

फ्रिजचा वास जाण्यासाठी काही उपाय

फ्रीज स्वच्छ, पुसून ,सुकवून घेऊन नंतर फ्रीजमध्ये सगळे अन्न झाकून ठेवले तरीही एक वेगळाच उग्र नकोसा वास फ्रीजमध्ये येतो. दूध फ्रीजमध्ये ठेवलं की त्या दुधाचा चहा पिऊ नये इतका त्या फ्रिजचा वास दुधाला येतो.. अशावेळी खालील पैकी एक उपाय करा.

१.     १. फ्रिजमध्ये कायमस्वरूपी दोन लाकडी कोळसे ठेवावेत , कुठलाही उग्र वास टिकत नाही.

२.    २.  एका वाटीत खायचा सोडा घालून ती वाटी उघडीच फ्रिज मध्ये ठेवा. वास जाईल.

३.    ३.  फ्रिज ऑटोमॅटिक डिफ्राॅस्टवाला असेल तर  बटन दाबून डिफ्राॅस्ट करावा लागतो.

(बटन दाबून डिफ्राॅस्ट करावा लागत असेल तर फ्रिजच्या पाठीमागे खालील बाजूस जे पाणी साठते ते काढून घ्यावे लागते. त्याचा देखील वास येऊ शकतो)

४.    ४.  वर्तमानपत्राचा कागद थोडासा भिजवून त्याचा गोळा करून ठेऊन द्या. आज ठेवलेला पेपर दुसऱ्या दिवशी टाकून द्या असे चार पाच दिवस करा.

५.     ५. एक वाटी पाण्यात व्हिनेगर आणि लिंबू रस मिसळून ठेवून द्या...हळूहळू वास कमी होईल व जाईल.

६.    ६.  लिंबाचे दोन भाग कापून ते ठेवा फ्रिजमधे.सगळा वास निघून जाईल.

७.     ७. फ्रिजमध्ये दूध सांडले आसेल तर वास येतो. त्यासाठी  पाणी व विम लिक्वीड लाऊन फ्रीज स्वच्छ पुसून काढा.

 

Friday, 3 June 2022

तांदळाच्या दिवशी,निवगर्‍या

 तांदळाच्या दिवशी,निवगर्या



रेसिपी : गॅसवर एका पातेल्यात एक कप पाणी उकळत ठेऊन त्यात चवीनुसार मीठ
व चिमुटभर हिंग घालावा. त्यात एक वाटलेली मिरची ,लिरेपूड आणि तीळ
घालावेत व पाव कप ताक घालावे. पाण्याला उकळी आली की त्यात एक कप
तांदळचे पीठ घालावे व उकड काढावी.
तेलाचा हात लावुन, परातीमध्ये उकड मळुन घ्यावी.
मग त्या उकडीचे पेढ्यासारखे चपटे गोळे करुन त्यात गोलाकार खळगा करावा आणि त्याला वाटीप्रमाणे आकार द्यावा. कुकरमधे प्रेशर ने देतादहा मिनिटे उकडुन घ्याव्या.
वरुन पगलु जिरे मोहरीची फ़ोडणी करुन ओतावी, आणि ओल्या खोबर्याच्याहिरव्या चटणीबरोबर खाव्यात.
खरे तर तशी चटणीची गरज नसते, पण चटणीबरोबर खूप छान लागतात.