तांदळाच्या दिवशी,निवगर्या
Search This Blog
Friday, 3 June 2022
तांदळाच्या दिवशी,निवगर्या
Sunday, 29 May 2022
भाताच्या चिकोड्या / सांडगे
Sunday, 16 January 2022
ओल्या नाराळाची कढी
ओल्या नाराळाची कढी
साहित्य
व कृती : खोवलेला ओल्या नारळाचा चव , एक छोटा कांदा, आलं-लसूण, कोथिंबीर
,जिरं एकत्र करून त्याच वाटण करून ठेवा. तापलेल्या तेलात कढीपत्ता
,मोहरी ,हिरवी मिरची, हिंगाची फोडणी देवून ते वाटण त्यात घाला. छान परतून झालं की बेसन लावलेलं
ताक घालून चवी प्रमाणे मिठ व चवीसाठी किमूटभर साखर घाला मस्त उकळल्या नंतर चिरलेली कोथिंबीर घाला.
Wednesday, 5 January 2022
मसाला इडल्या
मसाला इडल्या
Friday, 31 December 2021
मुळा व चणा डाळीचा चटकदार चटका
या चटकदार चटक्या बरोबर एखादी पोळी जास्तच जाते बर का .
Wednesday, 29 December 2021
मुळ्याचे मिनी डोसे
मुळ्याचे मिनी डोसे
आज सकाळी नाश्त्याला आम्ही
केले होते ‘मुळ्याचे मिनी डोसे ’ त्याचीच ही सचित्र रेसिपी
साहित्य : एक मुळा,चवीनुसार लाल मिरचीचे किंवा हिरव्या मिरचीचे तिखट व
मीठ,दोन मोठे चमचे बेसन पीठ , तेल
कृती : प्रथम मुळा स्वच्छ
धुवून व सालं काढून ,किसणीवर
किसून घ्या,एका परातीत मुळ्याचा कीस,दोन
मोठे चमचे बेसन पीठ आणि चवीनुसार लाल मिरचीचे /हिरव्या मिर्च्यांचे तिखट व मीठ एकत्र
मिक्स करून मिक्सरवर वाटून घ्या . मग त्यात पाणी घालून डोश्याच्या
पिठासारखे पीठ करून ठेवा.
गॅसवर मिनी डोश्यचा तवा तापत ठेवा,
तवा तापल्यावर तव्याच्या प्रत्येक भागात डावाने पीठ घालून दोन्ही
बाजूंनी भाजून घ्या.भाजतेवेळी सर्व
बाजूंनी चमच्याने थोडे तेल सोडा.
गरम मिनी डोसे टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.
Saturday, 25 December 2021
डेक्कन पराठा
डेक्कन पराठा


