मुळा व चणा डाळीचा चटकदार चटका
साहित्य : अर्धी वाटी भिजवलैली हरभर्याची डाळ, अर्धा मुळा, अर्धे लिंबू किंवा दोन मोठे चमचे दही , चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या व मीठ, जिरे, कोथींबीर,चवीपुती साखर.
मुळ्याच्या चकत्या करा. हरभर्याची डाळ, मुळ्याच्या चकत्या,लिंबाचा रस, ३-४ हिरव्या मिरच्या व मीठ, जिरे, कोथींबीर,चवीपुती साखर हे सर्व एकत्र करा. आणि मिक्सरला भरडच वाटायचे. म्हणजे टेस्ट छान येते. या भरड वाटणावर खमंग फोडणी द्या , फोडणीत हिंग पावडर जरा जास्तच टाका. असा चटकदार स्वाद येतो ना चटक्याला!
या चटकदार चटक्या बरोबर एखादी पोळी जास्तच जाते बर का .
No comments:
Post a Comment