भिजवलेला साबुदाणा,काकडी,कच्च्या बटाट्याचा कीस याची खिचडी
आज सकाळी नाश्त्यासाठी
आम्ही केली होती भिजवलेला साबुदाणा,काकडीचे काप ,कच्च्या बटाट्याचा कीस यांची खिचडी. एकदम
अफलातून झाली होती.
त्याचीच ही सचित्र रेसीपी
येथे शेअर करत आहे.
साहित्य : साबुदाणा (५-६
तास भिजवून) ,काकडी (चिरून बारीक तुकडे),कच्चा बाटा (किसून) ,शेंगदाण्याचे कूट, कोथिंबीर
(बारीक चिरून) ,लिंबाचा रस,साखर,तिखट व मीठ,फोडणीसाठी संजून तूप ,जिरे व फोडणीचे इतर
साहित्य
कृती : ५-६ तास छान भिजवलेला
साबुदाणा,एका कच्च्या बटाट्याचा कीस, एक काकडी बारीक शिरून,कोथिंबीर बारीक चिरून ,शेंगदाण्याचे
कूट, चवीनुसार लिंबाचा रस,साखर,मीठ व तिखट,साजूक तूप ,जिरे
एका मोठ्या स्टीलच्या
तसराळ्यात भिजवलेला साबुदाणा,कचहया बटाट्याचा कीस आणि बारीक चिरलेली काकडी व कोथिंबीर,शेंगदाण्याचे
कूट, चवीनुसार लिंबाचा रस,साखर,मीठ व तिखट सगळे एकत्र करून हाताने चांगले मिक्स करून
मुरण्यासाठी झाकून ठेवावे.
गॅसवर एका पॅन मध्ये फोडणीसाठी तूप घालून ते चांगले तापले की त्यात
जीरे घालून ते तडतडल्यावर त्यात मुरत ठेवलेले साबुदाणा आणि इतर वस्तू मिक्स करून ठेवलेले
सारण घालून कलथ्याने छान परतावे. पॅनवर झाकण
ठेवून छान वाफ काढून साबुदाणा शिजवून घ्यावा.
पुन्हा त्यावर बारीक चिरलेली
कोथिंबीर घालून पॅनवर झाकण ठेवा आणि गॅस बंद करा.
वाफ जिरली की झाकण काढून कलथ्याने एकदा परतून घेऊन खिचडी सर्व
करावी .
टिप : असेल तर वर ओल्या
नारळाचा चव भुरभुरावा.
आम्ही आजची खिचडी बायो-गॅसवर
केली
No comments:
Post a Comment