Thursday, 5 August 2021

गव्हाचे सत्व :

गव्हाचे सत्व : गहू दोन दिवस पाण्यात भिजवून तिसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.खूप बारीक नको. जास्त पाणी घालून हाताने दाबून चोथा वेगळा करावा व कंपोस्ट साठी वापरावा.
पाणी गाळून सेट (स्थिर) होऊ द्यावे. म्हणजे गाळ खाली बसेल. नंतर वरचे पाणी काढून घट्ट चीक दोन दिवस उन्हात वळवावा. वाळल्यावर त्यांची पावडर करून ठेवावी.
वर्षभर कॉर्नफ्लोर ला पर्याय म्हणून वापरू शकतो. याचा वापर करून केलेले कटलेट कॉर्नफ्लोर वापरुन केलेल्या कटलेटपेक्षा जास्त क्रिस्पी होतात.

Monday, 2 August 2021

फणसाच्या पानातील मंगलोरी इडली/खोट्टे इडली

फणसाच्या पानातील मंगलोरी इडली/खोट्टे इडली





इडलीचा हा प्रकार खूपच अनोखा व युनिक आहे . इडली अशी पण होऊ शकते हे मला आज कळले
ही मंगलोरची स्पेशल इडली रेसिपी आहे . एकदा नक्की करुन पहायच.
साहित्य : ६-७ फणसाची पाने,चार वाट्या इडलीचे तयार बॅटर (भिजवलेले पीठ)
चार वाट्या सांबार
छोटी वाटी भरुन हिरवी चटणी
कृती : आधी फणशाच्या पानांचा वापर करून कोन बनवा . आमच्याकडे फणसाची पाने नसल्यामुळे मी कुल्फीचे अॅल्यूमिनीयमचे कोण वापरले आहेत) त्यात इडलीचे तयार बॅटर भरा. स्टीमर मध्ये पाणी ठेवा वर एका चाळणीत ग्लास ठेवा, ग्लासमध्ये ते कोन ठेवा.
आता स्टीमर्चे झाकण बंद करून १५-२० मिनिटे शिजू द्या. थंड गार झाले की कोण मध्ये वाफेवर शिजलेल्या खोट्टे इडल्या काढा आणि फणसाच्या पानावर सांबार व हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करा.
विशेष टीप : पुण्यात आम्हाला फणसांची पाने कोठून मिळणार ? मग मी पानड्यांसाठी आपण नेहमी वापरतो तही हळदीची पाने वापरली आहेत. एव्हढा फरक सोडल्यास बाकी सगळे सेम आहे.

 

Sunday, 1 August 2021

शिळ्या पोळीचे स्वादिष्ट क्रंची फ्राइड फिंगर चिप्स

 शिळ्या पोळीचे स्वादिष्ट क्रंची फ्राइड फिंगर चिप्स



साहित्य : आदल्या रात्रीच्या दोन शिळ्या पोळ्या,एक छोटा चमचा लाल मिरचीचे तिखट,एक छोटा चमचा सैंधव मीठ,एक छोटा चमचा चाट मसाला, एकल छोटा चमचा तीळ,तळणीसाठी आरवश्यकतेनुसार तेल.
कृती : प्रथम शिळ्या पोळ्यांच्या कात्रीने लांब पट्या कापून ठेवा अर्धा इंच रुंदीच्या करून ठेवा. मग एका छोट्या स्टीलच्या थाळ्यात एक टेबलस्पून तेल घ्या. त्यात चवीनुसार लाल मिरचीचे तिखट,मीठ,चाट मसाला व तीळ घालून मिक्स करून ठेवा.
नंतर त्यात पोळ्यांच्या कापून ठेवलेल्या लांब पट्यांना सगळीकडून हाताने तेलात कालवलेला मसाला चोळून लावा व मुरत ठेवा.
आता गॅसवर एका कढईत तेल गरम करा. तेल चांगले गरम झाले की त्यात हे मसाला चोळून ठेवलेल्या पोळ्यांच्या लांब पट्या घालून मध्यम आंचेवर गोल्डन रंगावर तळून टिश्यू पेपरवर काढा.
हे शिळ्या पोळीचे स्वादिष्ट क्रंची फ्राइड फिंगर चिप्स दुपारच्या चहासोबत चाउ-माऊ सारखे सर्व्ह करा