दलियाची पौष्टिक खिचडी
दलिया खिचडी हा लोकप्रिय गुजराती प्रकार आहे. ह्यात गव्हाचा रवा (दलिया), मूग डाळ आणि भाज्या
घालतात. या खिचडीत तांदूळ अजिबात घालायचा नसतो. ज्यांना तांदूळ वर्ज्य आहे त्यांच्यासाठी, मधुमेही लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे. बाकी सर्वांनाच हा चविष्ट खिचडीचा
प्रकार आवडेल. ही खिचडी करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत.
ह्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. हिवाळ्यात मिळणार्या शेंगभाज्यांचे ताजे दाणे
घालू शकता. फक्त सगळ्या भाज्यांचे एकत्रित प्रमाण दलिया आणि मूग डाळीपेक्षा जास्त
असावं. तुम्ही पाहिजे असल्यास कांदा उभा चिरून बाकी
भाज्यांबरोबर किंवा तेलावर परतून घालू शकता. गरमागरम खिचडी साजूक तूप आणि कढीसोबत
अप्रतिम लागते.
टीप :
ही खिचडी गार झाल्यावर घट्ट होते. त्यामुळे गरम असतानाच खावी. नाहीतर परत
गरम करताना थोडं पाणी शिंपडून गरम करावी.
No comments:
Post a Comment