रताळ्याची खीर
काल गुरुवार १० जुलैला होती आषाढी द्वादशी,म्हणजेच एकादशीचे पारणे ! त्यासाठी आमच्या घराच्या गच्चीवरील मातीविरहीत बागेतून काढलेल्या रताळ्याची गोड खीर उपास सोडण्यासाठी३ केली होती. त्याचाच फोटो व साहित्य आणि कृती आज खाली देत आहे.
साहित्य : एक मोठे
रताळे,वाटीभर साखर,दोन मोठे चमचे साजूक तूप,दोन कप दूध,एक बारीक चमचा वेलची पूड,चार काजू,चार बदाम,चार बेदाणे
कृती : प्रथम रताळे
चांगले धुवून घ्या,मग ते
किसणीवर किसून घ्या,गॅसवर एका कढईत दोन चमचे साजूक तूप गरम करून
घेऊन त्यात रताळयाचा कीस सोनेरी रंगावर परतून घ्या,मग त्यात दोन
कप दूध खालून एक उकळी येऊ द्या,मग त्यात एक वाटी साखर घाला, आता त्यात एक बारीक चमचा वेलची पूड व चार काजू आणि चार बदाम तुकडे करून घाला,चार बेदाणेही घाला. रताळयाचा कीस शिजल्यावर
गॅस बंद करा.
No comments:
Post a Comment