कारल्याचे वेफर्स
साहित्य : रसरशीत ताजी कार्ली २५०ग्राम,आवश्यकतेनुसार तळणीसाठी तेल,चवीनुसार लाल तिखट व मीठ
कृती : प्रथम कारली स्वच्छ धुवून व कोरडी करून घ्या,दोन्ही बाजूंचे शेवटचे टोकाचा भाग कापून टाका,उरलेल्या कारल्याचे विळीवर अतिशय पात्तळ काप / चकत्या करून
घ्या,गॅसवर एका कढईत तेल तापवून घेऊन त्यात हे पात्तळ
काप टाकून तळून घ्या व एका चाळणीवर काढून घेऊन तेल निथळून घ्या. एका ताटात हे तळलेले
गरम काप घेऊन त्यावर चवीनुसार लाल तिखट व मीठ घालून हाताने चोळून सगळीकडे सारखे लागेल
असे बघा.
झाले हे कारल्याचे वेफर्स खाण्यासाठी तय्यार !
खास करून ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या साठी हे वेफर्स फारच आरोग्यदायी व उत्तम
आहेत.
No comments:
Post a Comment