गरम-गरम पौष्टिक स्वीट कॉर्न मिक्स व्हेजिटेबल सूप बाऊलमधून सर्व्ह करा.
स्वच्छंद
स्वच्छंद विचार व पाक-कृती
Search This Blog
Saturday, 23 August 2025
#मिक्स_व्हेजिटेबल_सुप
पोह्याचे जाळीदार डोसे
पोह्याचे जाळीदार डोसे
पोहे – १ मूठ भरून
दही – अर्धी वाटी
बेकिंग सोडा – अर्धा चमचा
किंवा इनो पावडर
रवा – पाव वाटी
पाणी- जरुरीनुसार
मीठ – चवीनुसार
आले,लसूण,मिरची व कोथिंबीर
यांचे वाटण
कृती : एका पॅनमध्ये पोहे
घेऊन त्यात रवा , दही आणि आले,लसूण,मिरची व कोथिंबीरीचे वाटण एकत्र करून
त्यात चवीनुसार मीठ घालून बनवून १५-२० मिनिटे मुरत
ठेवा.
मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त
घट्ट होणार नाही याची काळजी घ्यावी.
यानंतर बेकिंग सोडा घालून
मिक्स करा.
तव्यावर डावाने जाळीदार
डोसे घाला.
पोह्याचे जाळीदार डोसे तय्यार !
विशेष सूचना : तव्यावर
डोशाचे मिश्रण टाकण्याआधी तेल तव्याला लावायला विसरू नये, जेणेकरून तव्याला डोसे चिकटणार नाहीत.
Wednesday, 13 August 2025
मेतकूट पोहे
Sunday, 10 August 2025
भिजवलेला साबुदाणा,काकडी,कच्च्या बटाट्याचा कीस याची खिचडी
भिजवलेला साबुदाणा,काकडी,कच्च्या बटाट्याचा कीस याची खिचडी
आज सकाळी नाश्त्यासाठी
आम्ही केली होती भिजवलेला साबुदाणा,काकडीचे काप ,कच्च्या बटाट्याचा कीस यांची खिचडी. एकदम
अफलातून झाली होती.
त्याचीच ही सचित्र रेसीपी
येथे शेअर करत आहे.
साहित्य : साबुदाणा (५-६
तास भिजवून) ,काकडी (चिरून बारीक तुकडे),कच्चा बाटा (किसून) ,शेंगदाण्याचे कूट, कोथिंबीर
(बारीक चिरून) ,लिंबाचा रस,साखर,तिखट व मीठ,फोडणीसाठी संजून तूप ,जिरे व फोडणीचे इतर
साहित्य
कृती : ५-६ तास छान भिजवलेला
साबुदाणा,एका कच्च्या बटाट्याचा कीस, एक काकडी बारीक शिरून,कोथिंबीर बारीक चिरून ,शेंगदाण्याचे
कूट, चवीनुसार लिंबाचा रस,साखर,मीठ व तिखट,साजूक तूप ,जिरे
एका मोठ्या स्टीलच्या
तसराळ्यात भिजवलेला साबुदाणा,कचहया बटाट्याचा कीस आणि बारीक चिरलेली काकडी व कोथिंबीर,शेंगदाण्याचे
कूट, चवीनुसार लिंबाचा रस,साखर,मीठ व तिखट सगळे एकत्र करून हाताने चांगले मिक्स करून
मुरण्यासाठी झाकून ठेवावे.
गॅसवर एका पॅन मध्ये फोडणीसाठी तूप घालून ते चांगले तापले की त्यात
जीरे घालून ते तडतडल्यावर त्यात मुरत ठेवलेले साबुदाणा आणि इतर वस्तू मिक्स करून ठेवलेले
सारण घालून कलथ्याने छान परतावे. पॅनवर झाकण
ठेवून छान वाफ काढून साबुदाणा शिजवून घ्यावा.
पुन्हा त्यावर बारीक चिरलेली
कोथिंबीर घालून पॅनवर झाकण ठेवा आणि गॅस बंद करा.
वाफ जिरली की झाकण काढून कलथ्याने एकदा परतून घेऊन खिचडी सर्व
करावी .
टिप : असेल तर वर ओल्या
नारळाचा चव भुरभुरावा.
आम्ही आजची खिचडी बायो-गॅसवर
केली
Sunday, 27 July 2025
कारल्याचे चटकदार पंचामृत
आज सकाळी फ्रीज उघडल्यावर दोन कारली दृष्टीस पडली. आणि मनात आले की आज यांचाच वापर करावा आणि डावीकडे तोंडिलावणे म्हणून कारल्याचे पंचामृत बनवावे.
Monday, 19 May 2025
झटपट आंबा सरबत
झटपट आंबा सरबत
घरात
जर साखरांबा असेल तर चार चमचे साखरांबा घ्या, त्यात अर्धा चमचा मीठ आणि एक ग्लास पाणी व थोडा
बर्फ घालून ढवळा, छान सरबत होते,त्यातच
अननसाच्या बारीक फोडी टाकल्यास फारच उत्तम चव येते.
नुकतीच आमच्या कोकणातील 'अनीता फार्म' वरुन जावयांनी हापुसच्या आंब्याची पेटी पाठवली होती.