Monday, 26 December 2016

नाचणीचे आप्पे

नाचणीचे आप्पे

साहित्य :१ वाटी उडदाची डाळ (४-५ तास भिजवून ठेवा), १ वाटी नाचणीचं पीठ, १ वाटी बेसन, ३-४ हिरव्या मिरच्या-७-८ लसूण पाकळ्या-१ इंच आलं-अर्धी वाटी कोथिंबीर (हे सगळं एकत्र वाटून घ्या.), १ मोठा कांदा बारीक चिरून, मीठ चवीनुसार, थोडंसं तेल
चटणी साठी लागणारे साहित्य अर्धी वाटी पंढरपूरी फुटाण्याचे डाळं, पाव वाटी ओल्या नारळाचा खोवलेला चव (खोबरं), चविणसार २-३ हिरव्या मिरच्या, पेरभर आलं, वाटीभर कोथिंबीर ,चवीनुसार मीठ,चमचाभर लिंबाचा रस.
कृती : आदल्या दिवशी संध्याकाळी उडदाची डाळ ४-५ तास भिजत घालून ठेवा. पांच तासानंतर भिजलेली उडदाची डाळ मिक्सरमधून वाटून घ्या आणि मग त्यात नाचणीचं पीठ आणि बेसन घालून सगळं हातानं चांगलं फेटून घ्या.मग त्यात चवीनुसार मीठ घालून आणि रात्रभर ते पिठाचे पातेले उबदार जागी पीठ आंबवायला ठेवा.
दुसरे दिवशी सकाळी त्यात आले-लसूण-हिरवी मिरची-कोथिंबिर यांचे मिक्सरवर केलेले वाटण आणि बारीक चिरलेला कांदा घाला.
आप्पे पात्राला आतील बाजूला सगळीकडून थोडंथोडं तेल लावून मग या पिठाचे चमच्याने आप्पे घाला. दोन्ही बाजूंनी छान लाल होऊ द्या.

चटणीची कृती : वर चटणीसाठी दिलेलं सगळं साहित्य एकत्र करून मिक्सरवर चटणी वाटा. वाटतांना चटणीची एकदम पेस्ट न होऊ देता त्यात थोडं पाणी घालून जराशी सरबरीतच होऊ द्या.
आवडत असल्यास चटणीला वरून मोहरी-हिंग-उडदाची डाळ-कढीपत्ता घालून केलेली तडका फोडणी द्या.
आप्पे आणि ही चटणी सर्व्ह करा.
टीप : वर दिलेल्या साहित्यात अंदाजे ३५-४० आप्पे होतात.
याच पिठाचे उत्तप्पे सुद्धा होऊ शकतात.

No comments:

Post a Comment