Monday, 26 December 2016

आलू-मटारआलू-मटार
 
साहित्य : दोन वाट्या मटार,दोन-तीन  उकडलेले मोठे बटाटे साले काढून व फोडी चिरून ,दोन-तीन बारीक चिरलेले  कांदे ,एक चमचाभर धने-पूड,अर्धा चमचा जिरे-पूड,
फोडणीसाठी : अर्धा डाव तेल, पाव चमचा जिरे, एक छोटा चमचा हिंग, एक छोटा चमचा हळद, एक चमचा लाल मिरचीचे तिखट,पेरभर किसलेले आले, एक छोटा चमचा आमचूर पावडर,एक चमचा गरम मसाला ,एक वाटी फेटलेले दही,चवीनुसार मीठ,अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : गॅसवर एका कढईत तडका फोडणीसाठी तेल गरम करून घ्या व त्यात जिरे, हिंग हळद, लाल तिखट घालून एखादे मिनिट फोडणी परतावी.मग त्यात बारीक चिरलेला  कांदा आणि १/२ चमचा मीठ घालून कांदा लालसर व पारदर्शक  होईस्तोवर परतावे.
आता त्या  मटार आणि बटाट्यांच्या फोडी घालून चांगले परतावे. एका ताटात पाणी घालून ते कढईवर झाकण म्हणून ठेवून वाफ काढावी. मटार आणि बटाटा शिजले की त्यात आले, आमचूर पावडर, धणेपूड आणि जिरेपूड घालावे.
नंतर गसची आंच मंद करून त्यात फेतलेले दही घालून  भरभर ढवळावे. ग्रेव्हीमध्ये आवश्यक असेल तरच थोडेसे पाणी घालावे. चव पाहून जरूर असल्यास मीठ व लाल मिरचीचे तिखट वाढवावे. गरम मसाला सुद्धा  आत्ताच घालावा व भाजी ढवळावी. कढईवर झाकण ठेवून मंद आंचेवर दोन-तीन  मिनिटे उकळू द्यावे.गॅस बंद करून भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवावे.