Wednesday 26 February 2014

दुधी भोपळ्याची सुकी भाजी

दुधी भोपळ्याची सुकी भाजी

साहित्य : एक माध्यम आकाराचा दुधी भोपळा , पाव वाटी मुगाची डाळ , चवीनुसार लाल तिखट , धणे-जिरे ह्यांची पूड अर्धा चमचा,ओल्या पाव वाटी नारळाचा खवलेला चव , चवीनुसार मीठ , आवडीनुसार एक-दोन चमचे साखर , फोडणीसाठी तेल , मोहोरी , जिरे , हळ, हिंग  व हिरव्यामिरच्यांचे तुकडे , पाव वाटी शेंगदाण्याचे कूट , अर्धा कप दूध.

कृती : दुधीची भाजी करायला घेण्यापूर्वी एक तास आगोदर मुगाची डाळ कोमट पाण्यात भिजत घालून ठेवावी. दुधी भोपळ्यावरची साले काढून घेऊन मग विळीवर दुधीच्या माध्यम आकाराच्या फोडी करून घ्या,गॅसवर माध्यम आचेवर भाजीसाठी पातेले  पातेले तापत ठेवा,ते चांगले तापल्यावर त्यात फोडणीसाठी तेल घालून ते तापल्यावर त्यात प्रथम मोहोरी घालून टी तडतडल्यावर जिरे,हिंग व हळद घालून फोडणी करा व लगेचच त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे व मुगाची डाळ घालून थोडेसे परतून  घेऊन मग दुधीच्या फोडी घालून ढवळून घ्या  व अर्धा मिनिट झाकण ठेवा, झाकण काढल्यावर त्यात थोडे गरम  पाणी घालून भाजी शिजवून घ्या , नंतर त्यात धणे-जिरयाची पूड , लाल तिखट , चवीनुसार साखर व मीठ घालून भाजी ढवळून घ्या , मग त्यात शेंगदाण्याचे कूट , ओल्या नारळाचा चव व गार दूध घालून भाजी ढवळून घेऊन पुन्हा एकदा झाकण ठेवून भाजी थोडा वेळ शिजू द्या , थोड्या वेळाने झाकण काढून भाजी चांगली मिळून आलेली आहे का ते पहा व रसही पुरे दाट झाला असल्यास गॅस बंद करा.






No comments:

Post a Comment