Sunday, 23 February 2014

खमंग मेथीचे मुटके

खमंग मेथीचे मुटकेसाहित्य : एक  मध्यम आकाराची मेथीची जुडी , एक वाटी डाळीचे पीठ(बेसन) , चवीनुसार लाल तिखट , थोडीशी बारीक  कोथिंबीर , दोन तीन चमचे पांढरे तीळ (भाजून) , १/२ चमचा धणे जिरे पूड, एक चमचा शेंग दाण्याचे कूट , चवीनुसार मीठ , चविसाठी थोडीशी साखर व किसलेला गूळ , हळद व कडकडीत तेलाचे मोहन
कृती : प्रथम मेथी निवडून व बारीक चिरुन घ्यावी , नंतर ती धुवून घेऊन चाळणीवर निथळत ठेवावी. नंतर मेथी व इतर सर्व सामान एकत्र करुन त्यावर कडकडीत तेलाचे मोहन घालून पीठ भिजवावे. नंतर त्याचे लांबट आकाराचे गोळे करावेत. नंतर कुकरमध्ये चाळणीला तेलाचा हात लावून त्यावर हे गोळे वाफवून घ्यावेत.गार झाल्यावर कढईत जरा जास्त तेलाची फोडणी करुन त्यावर परतवून घ्यावेत.
 हे मेथी मुटके उन्धिऊ भाजीत घालतात. जेवणात तोंडीलावणे म्हणून किंवा नुसते भज्यासारखे खायला सुद्धा चांगलेच लागतात. 

No comments:

Post a Comment