Search This Blog

Thursday, 5 January 2012


भाजणीचे थालीपीठ


 भाजणीचे साहित्य : थालीपीठाच्या भाजणी पीठाचे साहित्य व विविध धान्यांचे प्रमाण -- ज्वारी १ किलो,बाजरी १-१/२किलो, मुग डाळ २० ग्रॅम,उडीदडाळ २० ग्रॅम, चणाडाळ ३०० ग्रॅम, अख्खी चवळी २० ग्रॅम, मटकी२० ग्रॅम, तांदुळ ३०० ग्रॅम, गहु २० ग्रॅम ,साल काढलेले सोयाबिन २० ग्रॅम. धने२५ ग्रॅम. जिरे ५० ग्रॅम. १च.चमचा मिरीचे दाणे. सर्व धान्ये/पदार्थ वेगवेगळे स्वतंत्रपणे मंद आचेवर खरपुस भाजूघ्यावेत व गार झाल्यावर एकत्र करुन भरड दळावी
थालीपीठ साहित्य व कृती : थालीपीठ करतेवेळी भाजणीमध्ये कांदा,लसूण,कोथिंबीर,तिखट,मीठ,हळद,हिंग व पानी घालून घोळे करून घ्यावेत व तव्यावर थोडेसे तेल घालून त्यावर भाकरीप्रमाणे थालिपीठ तापावे व बोटाने मध्यभागी एक व बाजूला तीन भोके पाडावीत व त्यात चमच्याने थोडे थोडे तेल सोडावे व गॅसवर ठेववे काही वेळानंतर थालीपीठ उलटावे व दुसर्‍या बाजूने भाजून घ्यावे.

भाजणीचे गरमागरम थालीपीठ एका डिशमध्ये घेऊन त्यावर लोण्याचा गोळा किंवा साजूक तूप घालून कैरीचे लोणचे / खाराच्या मिरच्या किंवा गोड दहयासोबत खाण्यास द्यावे. 

Thursday, 22 December 2011

मेथीची गोळा भाजी


  भाकरी आणी लसणाची फोडणी 





 साहित्य : १ कोवळ्या गावरान मेथीची मोठ्ठी जुड्डी (मेथी स्वच्छ निवडून ,चिरून व धूऊन चाळणीत ठेवावी ),बेसन पीठ २ चमचे,१०-१२ लसणाच्या पाकळ्या(बारीक तुकडे करून),१ मोठासा गुळाचा खडा,१छोटा चमचा लाल तिखट,१ छोटा चमचा मीठ,फोडणीसाठी ३-४ तेल,मोहोरी,हिंग व हळद  
कृती : प्रथम गॅसवर एका मोठ्या कढईत २ चमचे तेल तापत ठेवा॰तेल चांगले धूर येईपर्यंत तापल्यावर त्यात मोहोरी,हळद,हिंग व थोडे लसणाच्या पाकळ्यांचे बारीक तुकडे  घालून फोडणी करून घ्या व सर्वात शेवटी  स्वच्छ निवडून ,चिरून व धूऊन चाळणीत ठेवलेली मेथी घाला व परतून घ्या व थोडे पाणी घालून झाकण ठेऊन शिजवून घ्या.एका वाटीत थोडे पाणी घेऊन त्यात बेसनाचे पीठ कालवून घ्या व भाजी शिजली असेल तर त्यात ते मिक्स करा,चवीप्रमाणे तिखट,मीठ व गूळ घालून भाजीचा घट्ट गोळा होईपर्यंत शिजवून घ्या व  भाजीचा घट्ट गोळा झाल्यावर गॅस बंद करा.