मेथीची गोळा भाजी
साहित्य : १ कोवळ्या गावरान मेथीची मोठ्ठी जुड्डी (मेथी स्वच्छ निवडून ,चिरून व धूऊन चाळणीत ठेवावी ),बेसन पीठ २ चमचे,१०-१२ लसणाच्या पाकळ्या(बारीक तुकडे करून),१ मोठासा गुळाचा खडा,१छोटा चमचा लाल तिखट,१ छोटा चमचा मीठ,फोडणीसाठी ३-४ तेल,मोहोरी,हिंग व हळद
कृती : प्रथम गॅसवर एका मोठ्या कढईत २ चमचे तेल तापत ठेवा॰तेल चांगले धूर येईपर्यंत तापल्यावर त्यात मोहोरी,हळद,हिंग व थोडे लसणाच्या पाकळ्यांचे बारीक तुकडे घालून फोडणी करून घ्या व सर्वात शेवटी स्वच्छ निवडून ,चिरून व धूऊन चाळणीत ठेवलेली मेथी घाला व परतून घ्या व थोडे पाणी घालून झाकण ठेऊन शिजवून घ्या.एका वाटीत थोडे पाणी घेऊन त्यात बेसनाचे पीठ कालवून घ्या व भाजी शिजली असेल तर त्यात ते मिक्स करा,चवीप्रमाणे तिखट,मीठ व गूळ घालून भाजीचा घट्ट गोळा होईपर्यंत शिजवून घ्या व भाजीचा घट्ट गोळा झाल्यावर गॅस बंद करा.
Pramod
ReplyDeletewelcome to world of blogging
धन्यवाद !
Delete