Search This Blog

Monday, 1 February 2021

साबुदाण्याचे आप्पे

 

साबुदाण्याचे आप्पे

 


साहित्य: : एक वाटी साबुदाणा,दोन बटाटे (उकडून व कुस्करून),पाव वाटी दही,चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्या,एक चमचा जिरे,अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर,चवीनुसार मीठ ,अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट,चवीपुरती साखर ,आवश्यकतेनुसार तेल / तूप.

कृती : आप्पे बनविण्यासाठी  ३-४ तास आगोदर साबुदाणा भिजत घालून ठेवा.

चार तासानंतर भिजलेल्या साबुदाण्यामध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर,शेंगदाण्याचे कूट, वाटलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ व दही घालून चांगले मळून घ्यावे.थोडेसे पाणी घालावे.

दुसरीकदे अप्पे पात्राला तेलाचा / तुपाचा  हात लावून  लावून ते गॅसवर ठेवून गरम करावे.गरम आप्पेपात्रात चमच्याने मिश्रण घालावे.

गॅस मध्यम तआचेवर ठेवून आप्पेपात्रावर झाकण ठेवावे.

सुमारे ३-४  मिनिटे आप्पे तयार होवू द्यावे.झाकण काढून पहावे रंग बदलल्यास पलटावे व आप्पे दुसर्‍या बाजुनेही छान करून घ्यावेत.

आवश्यक वाटल्यास आप्यांवर थोडे थोडे तेल / तूप  सोडावे.

दोन्ही बाजूनी आप्पे झाले की पात्रातून काढावे व सर्व्हिंग प्लेटमध्ये दही कींवा चटणीसोबत सर्व्ह करावे.

 

 

 

No comments:

Post a Comment