ग्लोबल वार्मिंगच्या विनाशकारी प्रलय संकटापासून समस्त मानवजातीला वाचवण्यासाठी जगभर चालू असलेल्या “ वसुंधरा बचाव “ चळवळीत सहभागी होऊन इ.सन २००६ पासून पर्यावरणास पूरक असे अनेक उपक्रम आम्ही उभयतांनी घरी चालू केले. त्यातील आम्ही चालू केलेला एक अभिनव उपक्रम म्हणजे आमच्या स्वयंपाकघरातील रोजचा निर्माण होणारा सर्व प्रकारचा ओला कचरा ( म्हणजेच शिळे किंवा खराब झालेले अन्न व भाजीपाल्याचा अथवा फळांचा टाकाऊ भाग) महानगरपालिकेच्या कचरा कुंडीत न टाकता त्याचा पुर्नवापर करून पर्यावरणास हातभार लागावा या उद्देशाने आम्ही नोव्हेंबर २००९ पासून आमच्या जुन्या घराच्या १४' x १०' आकाराच्या गच्चीत, बायो-कल्चर निर्मिती म्हणजेच जैविक बगीचा फुलवला असून ओल्या कचर्यापासून (ह्यामध्ये निर्माल्य,फळांच्या साली व बिया,चहाचा चोथा, कोथिंबीर, पालक,शेपू, मेथी, चाकवत, अंबाडी,माठ,चुका, मुळा,करडई इत्यादि पालेभाज्यांची देठे,शिळे,खरकटे वा आंबलेले अन्न,टाकाऊ धान्य व पोरकिडे झालेले धान्य, कोंडा,बुरशी आलेला पाव, मटाराच्यासाली, बिरड्यांचीसाले, कलिंगड, फणस,केळी,आंबा,संत्रे, मोसंबी, लिंबू इत्यादि फळांच्या साली,अंडी,मटन व चिकनची हाडे,केसांचे गुंतवळ, नखे,खराब काळा गूळ इत्यादि जैविक विघटन होणारे काहीही ) यांचा वापर करून या बगीच्यात आत्तापर्यंत आम्ही आंबा,पेरु,चिक्कू,चिंच सिताफळ,डाळिंब,करवंद,आवळा, कलिंगड,अंजीर,स्ट्रॉबेरी,मलबेरी,जांभूळ,पपई,केळी,लिंबू इत्यादी) विविध प्रकारची फळझाडे लावली असून (वर्षाच्या आत त्यांचे नियमित उत्पादनही सुरू झाले आहे.तसेच आम्ही बागेत भाजीपाला (वांगी,टोमॅटो,पालक, मेथी, रताळी,हळद,आले,लसूण,कांदा पात,वालपापडी, पावटा, कोथिंबीर,पुदिना,अळू,शेवगा, हादगा,कोबी,मोहरी, मिरच्या,कार्ली, गवतीचहा, भेंडी, ओवा,रताळी,दोडके,कोहळा,घोसाळी,)लावला असून त्याचेही नियमीत उत्पादन चालू झाले आहे. याखेरीज या जैविक मातीविरहित बागेत आम्ही अनेक जातींची फुलझाडे लावली आहेत (अबोली,मोगरा,गुलाब,शेवंती,जाई,जुई,मदनबाण,कुंद, जास्वंद, झेंडू, निशिगंध,पारीजातक, रातराणी, सोनटक्का, अनंत, अँस्टर,सोनचाफा, ब्रम्हकमळ,डबलमोगरा,हजारी मोगरा, सदाफुली, तगर, चित्रक,,चिमिन ,अॅडेनियम,सक्यु लंट, इत्यादी.) लावलेली असून त्याचे नियमित उत्पादनही घेत आहोत .सोबत आमच्या जैविक बागेचे काही फोटो नमुन्यादाखल खाली दिलेले आहेत.
फुकट कंपोस्ट
माती विरहित बाग म्हणजे काय
आपल्या सर्वांची अशी ठाम धारणा / समजूत असते की बागेसाठी ‘ माती ‘ हवीच. मातीविना बाग होऊच शकत नाही.
पण
माझ्या स्वानुभवातून मी अशी बाग करता येते हे लोकांना पटवून देत असतो. ते कसे शक्य होते त्याबद्दल
आता सविस्तर सांगतो.
गच्चीवरील माती विरहित बाग या संकल्पनेत आपल्या गच्चीवर,बाल्कनीत किंवा घर/बंगल्याच्या आवारात बाग-बगीच्या फुलवतांना आपल्या घरातच
अगदी सहजपणे उपलब्ध होणाऱ्या (माती शिवाय) खाली दिलेल्या वस्तूंचा व नैसर्गिक
स्त्रोतांचा सुयोग्य व प्रमाणशिर वापर करावा हे अभिप्रेत आहे.
आपणांस अगदी विनासायास सहजपणे उपलब्ध असणारे नैसर्गिक स्त्रोत,
म्हणजेच झाडांची पाने, वाळलेला पालापाचोळा,फुलांचे
निर्माल्य, स्वयंपाकघरातील दररोज वापरात येणारा हिरव्या व
ओल्या भाजीपाल्याचा टाकाऊ (त्याज्य) भाग,फळांचा साली,नारळाच्या शेंड्या व करवंटयांचे तुकडे,रसवंतीगृहातून
मिळणारी ऊसाची चिपाडे, भाताचे तुस,विटांचे बारीक बारीक तुकडे,खडी व जाड वाळू हा होय.
पूर्वापार चालत आलेल्या रूढ पद्धती नुसार सामान्यत: आपण कुंडी अथवा
वाफा भरण्यासाठी Mother
Soil म्हणजेच १००% नदीकाठच्या गाळाच्या पोयटा माती आणि काही प्रमाणात खताचा वापर करत असतो.गाळाची
माती मिळत नसेल तर शेतातील माती किवा जमिनीतून उकरून काढलेली माती ज्याला Mother
Soil म्हणतात तिचा १००% वापर केलेला असतो.
पण कुंड्यात भरण्यासाठी अशी माती
आणणे ही खूप कष्टाचे व खर्चीक असते. शिवाय अशा मातीचा वापर करून भरलेल्या कुंडया जड होतात.
त्याउलट माझ्या पद्धतीने म्हणजेच मातीचा अजिबात वापर न करता वरील नैसर्गिक स्त्रोतांचा कुंडी वाफा
भरण्यासाठी वापर केल्यास त्यातून घरातील टाकाऊ ओल्या कचऱ्याचे अगदी सहजपणे
व्यवस्थापन होते. अशा पध्दतीने फुलवलेला बाग-बगीचा हा अधिक तजेलदार,
हिरवागार, टवटवीत तर असतोच पण त्यातून उत्पन्न
होणारी फळे, फुले, भाजीपाला हा
पूर्णपणे विषमुक्त व रासायनिक शेतीतील उत्पन्नापेक्षा अधिक चवदार व सत्वयुक्त
असतो. अशी गच्चीवरील माती विरहित बागेची संकल्पना असून सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक
अभिसरण घडवून आणणारी ही संकल्पना सर्वदूर पसरावी यासाठी प्रयत्न वाढवणे नितांत
गरजेचे असल्याने ते कार्य या GMVB समुहाच्या माध्यमातून
वेगाने बाळसे घेत आहे याचा मला आनंद वाटतो.
कंपोस्ट कधीही बिघडत नसते
बिघडलेले कंपोस्ट कसे दुरुस्त करावे? या
बद्दल घरातच कंपोस्ट बनवू इच्छिणार्या नवागत /शिकाऊ
सदस्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन मिळेल असा सविस्तर महत्वपूर्ण माहिती देणारी तनुजा महाजन यांची पोस्ट ग्रुपवर पोस्ट म्हणून प्रकाशित
करण्यात आली आहे.
ती वाचल्यावर या अनुषंगाने
माझ्या मनांत आलेले काही विचार येथे शेअर करत आहे जे शिकाऊ सदास्यांना मार्गदर्शक
होतील अशी खात्री वाटते .
कंपोस्ट बनवणे ही कोणतीही अशक्यप्राय अशी अवघड ,कोणालाही कधीच न जमणारी गोष्ट नाही. ती एक अत्यंत साधी,सुलभ,सोपी व नैसर्गिक अशी जैविक प्रक्रिया आहे. फक्त
ती प्रक्रिया कसे कार्य करते ते आपण प्रत्येकाने समजावून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
या कंपोस्ट प्रक्रियेत आपल्यासारख्या एखाद्या अनभिज्ञ नवख्या
व्यक्तीकडून आजाणतेपणाने अथवा अपुर्या
माहितीमुळे व अज्ञानाने काही गफलत झाली की मगच अडचणींना सुरवात होते. मग दुर्गंधी वाढीस लागतो, त्यात
अळ्या होतात. तेथे चिलटे,माशा घोंगाऊ लागतात. आणि असा त्रास
उद्भवला की नवखी व्यक्ती नाउमेद होते. अशा व्यकीचा सुरवात करतेवेळी असलेला उत्साह
कमी होत जातो. यातील बरेच जण या टप्प्यावर आपल्याला हे जमणारच नाही असा नकारात्मक
विचार करून ते बनवणेचं सोडून देतात.
असे म्हणतात की,सायकल शिकतांना किमान
एकदा तरी गुढगा फुटलाच पाहिजे, किंवा पोहणे शिकतांना एकदा
तरी गटांगळ्या खाऊ नाका-तोंडात पाणी जाऊन जीव घाबरा-घुबरा व्हायलाच हवा, म्हणजेच अशा स्वानुभवातून चुकत-माकत ,धडपडत ,तावून-सुलाखून घेतलेले शिक्षण आयुष्यभर ध्यानांत रहाते. तद्वतच
स्वानुभवातून घरच्या घरी कंपोस्ट प्रक्रिया शिकू पहाणार्या
प्रत्येकास एकदा हा अनुभव यावाच.
सर्वात प्रथम सर्व नवशिक्या लोकांनी कंपोस्ट बनवणे हाती घेण्यापूर्वी
कंपोस्ट प्रक्रियेविषयीच्या काही मूलभूत गोष्टी अवगत करून ,जाणून घेणे खूप गरजेचे आहे असे मला सांगावेसे वाटते.
कंपोस्ट ची सुलभ व्याख्या : ओल्या कचर्याचे
सूक्ष्म जिवाणूंद्वारे (बक्टेरिया) जैविक विघटन करून त्याचे उत्तम प्रकारच्या खता मध्ये
रूपांतर करण्याची पूर्णपणे नैसर्गिक अशी जैविक विघटनाची प्रक्रिया म्हणजेच 'कंपोस्ट'
धडा पहिला : पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे " कंपोस्ट
हे कधीही खराब होत नाही आणि वायाही जात नाही. तर कुठल्याही बिघडलेल्या टप्प्यावर
आपण ते सुधारून पुन्हा योग्य मार्गावर आणू शकतो" त्यामुळे नवागतांनी नाउमेद किवा
निराश होऊन कंपोस्ट बनवणे सोडू नाही. तर ते कसे सुधारता येते हे आत्मसात करून
घ्यावे.
धडा दूसरा : या कंपोस्ट म्हणजेच सूक्ष्म जिवाणूंच्या सहाय्याने होणार्या विघटन प्रक्रियेसाठी चार मुलभूत घटकांची आवश्यकता असते आणि ते घटक आहेत
१. नायट्रोजन २. कार्बन ३. ऑक्सिजन आणि ४. आर्द्रता (दमटपणा किंवा ओलावा). तसेचं
ही प्रक्रिया चालू असतांना अखेरचा टप्पा पार पडेपर्यंत या चार घटकांचे सुयोग्य
मात्रेत संतुलन राखणे हेही खूप गरजेचे असते.
धडा तिसरा : १. नायट्रोजन म्हणजेच नत्र हा घटक ओल्या हिरव्या कचर्यातून मिळतो. हिरवी पाने,भाजीपाला व त्याची देठें या
सगळ्यात नत्राचे प्रमाण मुबलक मात्रेत असते.
२. कार्बन म्हणजेच कर्ब. झाडांच्या [आणातून व वाळलेल्या पाला-पाचोळयातून (ड्राय ब्राऊन वेस्ट)
मुबलक प्रमाणांत प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असणारा कार्बन हा घटक मिळतो.
३. ऑक्सीजन म्हणजेच प्राणवायू : प्राणवायूचे महत्व मी निराळे
सांगण्याची आवश्यकता नाही. या सृष्टीतील एकही प्राणिमात्र प्राणवायूशिवाय जगूच
शक्त नाही हे आपण सगळेच जाणतो. मग त्याला ओल्या कचार्याचे विघटनाचे अविरतपणे कार्य करणारे सूक्ष्म जिवाणू म्हणजेच 'बक्टेरिया' हेही अपवाद कसे असतील? त्यांनाही प्राणवायूची म्हणजेच ऑक्सीजनची नितांत गरज असते हे निराळे
सांगण्याची आवश्यकता नाही. आणि हा अत्यावश्यक असा ऑक्सीजन मुबलक प्रमाणांत
मिळण्यासाठी ओल्या कचर्यात हवा खेळती रहाणे खूप गरजेचे
असते. म्हणूनच आपण कंपोस्टसाथी जे कंटेनर (माठ,बादली,खोके इ) वापरणार असतो त्याला तळांत आणि सर्व बाजूंनी भोके ठेवावीत.
त्याचप्रमाणे दर दोन दिवसाआड कचरा खालीवर करत जावा,जेणेकरून
हवा खेळती राहील. तसेच आणखी एक महत्वाची सुचना करावीशी वाटते ती म्हणजे नवा कचरा
घालतांना त्यात काड्या, काटक्या, आणि
वाळलेली मोठाली पाने (याला ड्राय ब्राऊन वेस्ट म्हणतात) ह्यांचा आवर्जून वापर करा,जेणेकरून हवेचे छोटे छोटे कप्पे तयार होऊन हवा खेळती राहिल.
४. ओलावा/ आर्द्रता/ दमटपणा : विघटनाचे महत्वपूर्ण कार्य करणार्या सूक्ष्म जिवाणूंच्या वाढीसाठी आणि त्यांचे विघटनाचे कार्य जोमाने
होण्यासाठी ओलावा किंवा दमटपणा म्हणजेच आर्द्रतेची जरूर असते. त्यामुळेच जर कचरा
जास्त कोरडा (सुका) असेल तर त्यावर थोडासा पाण्याचा शिडकावा जेणेकरून कचर्यात ओलावा निर्माण होऊन विघटनाचे कार्य सुयोग्य पद्धतीने होईल.
धडा चौथा : कंपोस्ट प्रक्रियेत बिघाड होण्याची प्रमुख कारणे व
त्यावरील उपाय : कधी कधी ओल्या कचर्यात टोमॅटो,काकड्या या भाज्यांचा टाकाऊ भाग किंवा कलिंगड,खरबूज,द्राक्षे अशा पाण्याचा अंश जास्त असणार्या
भाज्यांचा/फळांचा टाकाऊ भाग जास्त असतो. त्यामुळे कचर्यातील
ओलावा किंवा पाण्याचे प्रमाण वाढून संतुलन बिघडते. सामान्यपणे चार घटकांचे संतुलन
असलेल्या कचर्याचे विघटन होतांना सूक्ष्म जिवाणूंच्या कार्य
पद्धतीने कचरा कुजायला सुरवात होते. या प्रक्रियेत कचरा असा कुजणे
अभिप्रेत/अपेक्षित असते. पण जेंव्हा वर सांगितलेल्या भाज्यांच्या किंवा फळांच्या
माध्यमातून कचर्यातील पाण्याचे प्रमाण वाढते तेंव्हा
कुजण्याची प्रक्रिया थांबते आणि कचरा सडायला सुरवात होते,आणि
मगच कचर्याला दुर्गंधी यायला सुवात होऊन पुढचे दु:ष्परिणाम
जाणवायला लागतात.
एकदा रोगाचे निदान झाले की त्यावर उपाय करणेही फार सोपे आणि सुलभपणे
करणे शक्य होते. काहीही उपाय करून आपल्याला कचर्यातला
ओलावा म्हणजेच पाण्याचे प्रमाण कमी करून नियंत्रणांत आणायचे असते.
त्यासाठी असे पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या ओल्या कचर्यावर वाळलेला पाला-पाचोळा पसरावा, किंवा कोरडी माती
भुभुरावी अथवा नारळाच्या शेंड्यांचा चुरा/कोकोपिट ,भाताचे तुस, किंवा पुठ्याचे अगर
कागदाचे तुकडे टाकावे म्हणजे कचर्यातले अतिरिक्त पाणी त्या
कोरड्या पदार्थांनी शोषले जाऊन ओलावा नियंत्रणात आणला जाईल व लगेच त्याचा परिणाम
होऊन दुर्गंधी कमी होऊन कंपोस्टची प्रक्रिया सुरळीत चालू होईल.
छान तपशीलवार माहिती����
ReplyDeleteमी जिवामृत आणले आहे. ते बागेसाठी कशा पद्धतीने वापरावे? पाणी किती प्रमाणात मिसळावे?
एक लीटर पाण्यात १०० मिली (चहाचा एक कप) जिवामृत मिसळा.
Deleteफारच छान आणि उपयुक्त माहीती आहे. धन्यवाद काका
ReplyDeletechan
ReplyDeleteखुप छान माहिती व कल्पना.
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteExcellent....
ReplyDeleteVery nice wil try definitely
ReplyDeleteUseful information. Thanks and regards.
ReplyDeleteछान माहिती
ReplyDeleteछान माहिती आहे. मला खूप आवडली.. please मला ग्रुप मध्ये add कराल का... धन्यवाद सर..
ReplyDeleteKhup chan mahiti
ReplyDeleteउपयुक्त माहिती
ReplyDeleteधन्यवाद
उपयुक्त माहिती
ReplyDeleteAapli mahiti khup aavadli. Mala ek sangal ka Anna takalya mule uundir, ghushi Yancha trash hot nahi Ka jar kundit rope jaminiver asatil tar.
Deletethank u :)
ReplyDeleteफारच छान माहिती धन्यवाद
ReplyDeleteThanks, very useful information.
ReplyDeleteThanks for sharing useful information.
ReplyDeleteखुपच छान
ReplyDeleteThanks.12 varsha pasun karte.surwatila bhopla,4kg.cha aala 12 khabooj aale tyatil 1,2kg.che,papaya aale.aata yet nahit.fulzade matra chan fultat.mi mati pan wapate.any sujestions please.
ReplyDeleteखूप उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद.
ReplyDeleteउपयुक्त माहिती
ReplyDeleteखुपच उपयुक्त
ReplyDeleteसुंदर आहे
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteapratim !!
ReplyDeleteखूप छान माहिती
ReplyDeleteखूप छान माहीती दिलीत..Practical करण्यास एकदम उपयुक्त आहे.
ReplyDeleteमुंबईत बायो कल्चर कुठे मिळेल प्लीज सांगू शकाल का ९९६७५८९६८५
ReplyDeleteबाजारातून महागडे विकतचे बायोकल्चर आणायची काहीच आवश्यकता नाही. तुम्ही कल्चरम्हणून ताक किंवा दह्याचे पाणी याचाही वापर करू शकता. शेणाचा काला सुद्धा चालू शकेल.
Deleteकोणत्याही कृषि भांडारात मिळेल.
Deleteखूप छान माहिती, धन्यवाद
ReplyDeleteAmazing
ReplyDeleteखूपच उपयुक्त व तपशीलवार माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
ReplyDeleteDesign ,stracter give me
ReplyDeleteफारच छान आणि उपयुक्त माहीती आहे. धन्यवाद काका
ReplyDeleteVery nice!!
ReplyDeleteMahiti khupach chan ahe
ReplyDeleteMe thodi far zhade lavlit pn bhajya lavlya ki tya purna vadhatach nahi lagech jalun jatat kinwa vadhale tari tyala fal kinwa ful yet nahi
Chan ahe mahiti,he vachun Mala pn ghari bhajya lavnyachi awad nirman zhali
ReplyDeleteखूपच छान कल्पना आहे. मी माझ्या गच्चीत नक्कीच अशा पद्धतीने बगीचा फुलवेल
ReplyDeleteमि कुंडीमधे खायच्या पानाची वेल लावली आहे.पण त्याची वाढ नीट होत नाहीय काय करावे.तसेच गुलाब टगर फुलझाडे सुद्धा आहेत त्यांना कांद्याचे पाणी कसे घालायचे याची क्रुपया माहीती द्या.
ReplyDeleteमी कालच आपला ग्रुप join केला.उपरोक्त माहिती वाचली.मला पण कुंडीत लागवड करायची आहे.सध्या lock down काळात bioculturre पावडर मिळू शकत नाही,तर फक्त कचरा टाकून त्यात रोप लावू शकतो का?
ReplyDelete2.माझ्याकडे मोट्या कुंडीत कमळाची रोपे लावली आहेत (अनेक वर्षे झालीत)परंतु अजून एकही फुल आले नाही तर काय करावे??हीच गत ब्रह्म कमळाची देखील आहे कृपया मार्गदर्शन व्हावे
Namaskar. Thank you for the valuable information.
ReplyDeleteI have a terrace to my house. I would like to make use of it for this porpose. Kindly guide.
Tumcha lekh vachlya nantar lagech baag kamala lagave ase vatate... khuup chan mahiti. Tumchyakade pan khate miltil ka?
ReplyDeleteTumcha lekh vachlya nantar lagech baag kamala lagave ase vatate... khuup chan mahiti. Tumchyakade pan khate miltil ka?
ReplyDeleteखूपच खूपच उडबोधक् माहिती
ReplyDeleteVery informative information for beginners like me.
ReplyDeleteVery useful information, thank you!! Can you tell me how to make your own bio-culture at home? I generally grind all the kitchen garbage with cooked rice water & feed that to my plants. This includes all the vegetable stems, tea powder, vegetable and fruit peels, left over spoiled food etc.
ReplyDeleteThank you in advance.