Search This Blog

Friday, 11 May 2018

(चिंचेच्या) #कोळाचे पोहे


गतवर्षी झी टीव्ही वर रात्री ८.३० वाजता लागणाrर्‍या लोकप्रिय   " जुळून येती रेशीमगाठी " या मालिकेत देसाई कुटुंबात पाहुणी महणून आलेली चित्रा तिचा नवरा मनोज याच्या साठी तो कोकणातला असल्याने खास त्याच्या आवडीचे  कोकणात केले जाणारे " कोळाचे पोहे" करते व नाना देसाई सुद्धा त्या पोहयांची  खूप  स्तुति करतात व मनोजला त्याची रेसिपी विचारतात व त्यावेळी तो जी रेसिपी सांगतो ती ऐकून मी ती लिहून ठेवली होती व काल संध्याकाळी आम्ही त्या रेसिपी प्रमाणे " चिंचेच्या कोळाचे पोहे "  केले होते.त्याचीच ही सचित्र रेसिपी मी तुमच्यासाठी येथे शेअर करत आहे.
(चिंचेच्या) कोळाचे पोहे
 साहित्य : दोन वाट्या  जाडे पोहे , दोन वाट्या नारळाचं दूध,चवीनुसार चिंचेचा कोळ किंवा आगळ ,गू़ळ,लाल तिखट व मीठ ,फोडणीसाठी तूप आणि जिरे , मूठभर चिरलेली कोथिंबीर
कृती : जाडे पोहे चाळणीत धुवून निथळूत ठेवा. एका स्टीलच्या पातेल्यात नारळाचे दूध घेऊन  दुधात चवीनुसार चिंच किंवा आगळ, गूळ, लाल तिखट आणि मीठ घालून त्याला तूप/जिर्‍याची फोडणी द्यायची. आवश्यकता वाटल्यास एक चटका देऊन (थोडं गरम करून) गूळ विरघळवून घ्यायचा. उकळी आणायची आवश्यकता नाही. कोळ गारच चांगला लागतो.
आवडत असल्यास मिरगुंडं किंवा पोह्याचे पापड चुरडून वर घालावेत.
एका काचेच्या बाउलमधे भिजवलेले जाड पोहे घालून त्यावर ते पूर्ण बुडतील इतका कोळ घालायचा, वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची. मिरगुंडं/पापड हवं तर कुस्करून त्यावर घालायचे किंवा जोडीला घ्यायचे.


No comments:

Post a Comment