Tuesday 1 May 2018

अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म


अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म


प्रतिज्ञा :
१ . अन्न तयार करतेवेळी ,इतरांना अन्न वाढतेवेळी तसेच स्वत: अन्न ग्रहण करतेवेळी (खातेवेळी) मी अतिशय काटेकोरपणे स्वच्छतेचे पालन करेन.
२ . मी अतिशय मन:पूर्वक व श्रद्धापूर्वक अन्न तयार करेन.
३ . इतरांना अन्न वाढल्यानंतरच मी अन्न ग्रहण करेन.  (खाईन)
४ . जेवतांना मी कोणत्याही आवडी-निवडी ठेवणार नाही व अन्नाबद्दल कोणतीही तक्रार करणार नाही.
५ . जेवतांना मी पानात काहीही टाकणार नाही व अन्नाची नासाडी होऊ देणार नाही,अन्न वाया जाऊ देणार नाही.
६ . जेवतांना मी अन्नाबद्दल कोणतीही तक्रार करणार नाही.
७ . जेवतांना मी श्रद्धेने,आनंदाने व समाधानाने जेवणाचा आस्वाद घेईन व जेवण झाल्यावर तृप्तीचा ढेकर देईन.
८ . जेवतांना मी बडबड करणार नाही व निमूटपणे माझे लक्ष फक्त जेवणावरच केंद्रीत करेन.
९. सर्वांना नेहमी पुरेसे अन्न मिळू देअशी मी जेवणापूर्वी प्रार्थना करीन.
१०. अन्न तयार करताना, वाढताना व खाताना मी अतीशय स्वच्छता पाळीन.
किचनमधे प्रवेश केल्यानंतर प्रथम सुगंधीत अगरबत्ती लावा. गॅसचे शेगडीला हळद व कुंकू वाहा आणि नमस्कार करा. तुमचे मन प्रसन्न राहील असे् तुमच्या आवडीचे कोणतेही संगीत लावा, आणि अगरबत्तीच्या सुगंधीत व संगीताच्या धुंद वातावरणात कामास सुरुवात करा.

भोजनास ब अन्नग्रहण करण्यापुर्वी दोन्ही हातजोडून  अन्नपुर्णेला वंदन करावे आणि तिचे स्तवन म्हणून खालील श्लोक म्हणावेत व  मगच  अन्नाचा पहिला घास ग्रहण करावा.

 वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
    सहज हवन होते नाम घेता फुकाचे
    जिवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह
    उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
    जनी भोजनी नाम वाचे वदावे
   अती आदरे गद्यघोषे म्हणावे
   हरीचिंतने अन्न सेवित जावे
   तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे

No comments:

Post a Comment