पुदिना रोल्स्स
कृती : एका बाउलमध्ये तीन वाट्या मैदा,तीन टेबलस्पून तेल, अर्धा चमचा ओवा,अर्धा चमचा काळी मिरी पूड व चवीनुसार मीठ एकत्र कोरडेच मिक्स करून घ्या व नंतर त्यात जरुरीनुसार पाणी घालून नेहमी आपण पुर्यांसाठी भिजवतो तसे घट्ट इथ भिजवून व मळून घेऊन मुरण्यासाठी एका ओल्या तलम सूती कपड्याने १५-२० मिनिटे झाकून बाजूला ठेवा.
आता दुसरे बाऊल घेऊन त्यात तीन वाट्या मैदा,तीन टेबलस्पून तेल, दोन टेबलस्पून पुदिण्याची घट्ट पेस्ट व चवीनुसार तिखट व मीठ घालून गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालून नेहमी आपण पुर्यांसाठी भिजवतो तसे घट्ट इथ भिजवून व मळून घेऊन मुरण्यासाठी बाऊल एका ओल्या तलम सूती कपड्याने १५-२० मिनिटे झाकून बाजूला ठेवा.
आता पुदिण्याच्या पिठाचे लिंबाएव्हधे गोळे बनवून घेऊन पोळपाटावर त्यांच्या गोल पुर्या लाटून घ्या व एका ताटात काढून ठेवा.
मग त्याचप्रमाणे ओवा व मैद्याच्या पिठाच्या पुर्या लाटून घ्या,आणि त्याही दुसर्या ताटात काढून ठेवा.
आता पुदिण्याची एक गोल पुरी पोळपाटावर ठेवा,त्यावर ओवा-मैद्याची गोल पुरी ठेवा (पुरीवर पुरी) व हाताच्या तळव्याने वरून थोडा दाब द्या, आणि दोन्ही पुर्या एकत्र ठेवून त्यांची गुंडाळी (वळकटी) वळा.
सुरीने पाऊण इंच रुंदीच्या बाकरवडीसारख्या वड्या (रोल्स) कापुन ठेवा.
आता गॅसवर एका कढईत तळणीसाठी तेल तापत ठेवा. तेल चांगले कडकडीत तापून त्यातून धूर येऊ लागला की त्या तापलेल्या तेलात ७-८ रोल्स सोडून हलक्या गोल्डन रंगावर तळून पेपर नॅपकीनवर काढा,म्हणजे रोल्समधील जास्तीचे तेल शोषले जाईल.
थंड झाल्यावर टोमॅटो सॉस किंवा एखाद्या आवडत्या चटणीसोबत दुपारच्या चहाचे वेळी सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment