Search This Blog

Friday, 17 July 2015

चिंचेच्या पाल्याची चटणी



चिंचेच्या पाल्याची चटणी 

 
  
साहित्य : वाटीभर चिंचेचा पाला,एक टेबलस्पून धने,एक टेबलस्पून तीळ,३-४ लाल सुक्या मिरच्या,अर्धी वाटी सुक्या गोटा खोबर्‍याचे तुकडे,दोन चमचे तेल,पाव चमचा भाजलेली मेथीची पावडर,पाव छोटा चमचा हळद,चिमूटभर हिंग,एक चमचा गुलाची पावडर,चवीनुसार मीठ.
फोडणीसाठी : एक चमचा तेल,अर्धा चमचा मोहरी,अर्धा चमचा उडदाची डाळ,७-८ कढीपत्त्याची पाने.
कृती : चिंचेचा पाला हलकेच धुवून व सूती पंच्यावर टाकून वाळवून घ्या. (पाला धुतांना जास्त चोळू नका,कारण तसे केल्यास पाल्याचा आंबटपणा कमी होईल)
गॅसवर एका फ्राय पॅनमध्ये धने भाजून घ्या. ते एका वाटेत काढून बाजूला ठेवा व त्याच पॅनमध्ये तीळ भाजून घ्या. मग लाल सुक्या मारच्या भाजून घ्या.शेवटी सुक्या खोबर्‍याचे तुकडे भाजून घ्या.
मिक्सर ग्राइंडर मध्ये धने,तीळ,लाल सुक्या मिरच्या,भाजून घेतलेले सुक्या खोबर्‍याचे तुकडे,गुलाची पावडर आणि मीठ घालून वाटून घ्या.
आता त्याच फ्राय पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेऊन त्यात हिंग,भाजलेली मेथीची पावडर व हळद घालून फोडणी करून घ्या. फोडणी १-२ मिनिटे परतून घेतल्यावर त्यात चिंचेचा पाला घालून परतून घ्या.
आता मिक्सरच्या ग्राईंडरमध्ये हे फोडणीत परतलेल्या चिंचेच्या पाल्याचे मिश्रण व आगोदर करून ठेवलेले वाटण एकत्र कारुन  थोडेसे पाणी घाला व चटणी वाटून घ्या.  
गॅसवर पुन्हा फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी घालून ती तडतडल्यावर त्यात उडदाची डाळ घालून गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्या व मग कढीपत्त्याची पाने घालून एक मिनिट परतून घेऊन गॅस बंद करा.
ही फोडणी चटनिवर ओटा व कालवून घ्या.
गरम भात किंवा पोळी सोबत सर्व्ह करा.


No comments:

Post a Comment