मसालेदार लसूणी-बटाटा भाजी
साहित्य : १०-१२
छोटे बेबी बटाटे , १०-१२
लसणाच्या पाकळ्या ,एक छोटा कांदा-बारीक चिरून, एक इंच आल्याचा तुकडा- बारीक चिरून , तीन काश्मिरी
लाल मिरच्या, एक माध्यम आकाराचा टोमॅटो-बारीक चिरून,एकेक चमचा धने-जिरे पूड, अर्धा चमचा लाल मिरचीचे
तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, चिमूटभर
हळद ,चवीनुसार मीठ ,अर्धा चमचा गरम
मसाला, दोन डाव तेल ,बारीक चिरलेली
कोथिंबीर
कृती :
सुक्यालाल काश्मिरी मिरच्या दहा मिनिटे भिजत घालून ठेवा. प्रेशरकुकरमधून छोटे बेबी
बटाटे छोटा चमचा मीठ घालून उकडून व सोलून घ्या.
आले,लसूण,भिजत घातलेल्या काश्मिरी
लाल मिरच्या,टोमॅटो,धने-जिरे पावडर व
चिमूटभर हळद घालून मिक्सरमध्ये वाटून घेऊन टोमॅटो-लसूण पेस्ट बनवून ठेवा.
गॅसवर
एका नॉनस्टिक कढईत एक टेबलस्पून तेल गरम करुन त्यात उकडून ठेवलेले बटाटे दोन
मिनिटे परतून घ्या.त्यावर गरम मसाला व चाट मसाला भुरभुरून पुन्हा दोन मिनिटे परतून घ्या व गॅस बंद करून
मसाल्यात परतलेले बटाटे एका दुसर्या
पातेल्यात काढून घ्या.
नंतर
त्याच नॉनस्टिक कढईत चार टेबलस्पून तेल गरम करून घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा
घासलून सोनेरी रंगावर परतून घ्या. मग त्यात आधी बनवून ठेवलेली टोमॅटो-लसूण पेस्ट
घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.नंतात लाल मिरचीचे तिखट घालून चांगले मिसळून घ्या
व शेवटी परतून ठेवलेले बटाटे घालून पाच मिनिटे शिजवून घ्या.
गॅस
बंद करून ही मसालेदार लसूणी-बटाट्याची भाजी सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घ्या. वर
बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम लसूणी-बटाट्याची मसालेदार भाजी सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment